esakal | ऑफलाइन लग्न अन्‌ शुभेच्छांचा ऑनलाइन पाऊस!
sakal

बोलून बातमी शोधा

wedding ceremony took place at home in Yavatmal

लॉकडाउन होण्यापूर्वीच यांची लग्नगाठ यवतमाळ येथील महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक ऋषिकेश प्रभाकर शिरभाते यांच्याशी जुळलेली होती. गेल्या 29 मार्च रोजी लग्नाचा धुमधडाका उडविण्यासाठी मित्रमंडळींसह नातेवाईक उत्सुक होते. परंतु, लॉकडाउनमुळे सर्वांच्या उत्साहावर विरजण पडले.

ऑफलाइन लग्न अन्‌ शुभेच्छांचा ऑनलाइन पाऊस!

sakal_logo
By
दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : लग्न म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण. अलीकडे नव्यापिढीत हा एक "इव्हेंट' बनला आहे. सहाजीकच फुल्ल "एन्जॉय' करण्यासाठी पैशांचा पाऊस पडणारच. परंतु, या इव्हेंटला कोरोनाने सध्या "ब्रेक' लावला आहे. काहींनी "ऑनलाइन' साखरपुडा केल्याच्या बातम्या झळकल्यात. मात्र, पुसदमध्ये सहायक पोलिस निरीक्षक शुभांगी आगाशे व सहयोगी प्राध्यापक ऋषिकेश शिरभाते यांचे शुभमंगल गुरुवारी "ऑफलाइन' अर्थात घरीच साधेपणाने झाले. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी भरभरून "ऑनलाइन' शुभेच्छा दिल्यात. 

पुसद येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव आगाशे यांची कन्या शुभांगी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात सहायक पोलिस निरीक्षकपदावर कार्यरत आहेत. त्यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनमध्ये आपले कर्तव्य कठोरपणे बजावले. "तुम्ही घरात थांबा. कोरोनाच्या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी आम्ही रस्त्यावर थांबतो', असे सांगत त्यांनी पोलिस वर्दीतील माणुसकी सांभाळली. 

हेही वाचा - सर्वत्र "लॉकडाउन', तरिही तंबाखू अन्‌ दारू येते कुठून?

लॉकडाउन होण्यापूर्वीच यांची लग्नगाठ यवतमाळ येथील महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक ऋषिकेश प्रभाकर शिरभाते यांच्याशी जुळलेली होती. गेल्या 29 मार्च रोजी लग्नाचा धुमधडाका उडविण्यासाठी मित्रमंडळींसह नातेवाईक उत्सुक होते. परंतु, लॉकडाउनमुळे सर्वांच्या उत्साहावर विरजण पडले. यामुळे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. 

त्याचवेळी कोरोनाने जग व्यथित झाले असताना लग्नाचे "इव्हेंट सेलिब्रेशन' न करण्याचा मनोदय शुभांगी आगाशे यांनी भावी पतीकडे व्यक्त केला. ऋषिकेश शिरभाते हे समाजकार्य विषयाचे प्राध्यापक असल्याने त्यांना ही संकल्पना भावली. पुढे कुठलाही बडेजाव न करता लग्नसमारंभ साधेपणाने करावा, यासाठी त्यांनी दुजोरा दिला. घरची मंडळीही राजी झाली आणि गुरुवारी (ता. 16) आईवडील, भाऊ, बहिणी व जावई अशा मोजक्‍या जणांच्या साक्षीने घराच्या अंगणातच नवयुगुलाच्या डोक्‍यावर मंगलाक्षता पडल्या. 

ठळक बातमी - अर्धा महिना उलटल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आनंद

हाती केवळ फुलांचे दोन गुच्छ

ना वरात, ना घोडा... ना वाजंत्री ना फटाके, हाती केवळ फुलांचे दोन गुच्छ. एक मात्र झाले, पोलिस विभागातील अधिकारी, सहकारी व महाविद्यालयातील प्राध्यापक, मित्रमंडळी यांच्या शुभेच्छांचा नवदाम्पत्यावर घरी थांबूनच "ऑनलाइन'वर जणू पाऊस पडला. मुख्य म्हणजे लक्षावधी रुपयांच्या लग्नखर्चात कोरोनाने मोठी बचत केली. एकूणच लग्नाच्या इव्हेंटसाठी कोरोनाची भीती इष्टापत्ती ठरली. 

loading image