नगरसेवकांच्या अपात्रतेवर बुधवारी सुनावणी 

file Photo
file Photo

कामठी (जि.नागपूर)  : येथील प्रभाग क्रमांक 10 चे कॉंग्रेसचे नगरसेवक काशिनाथ गुलाबराव प्रधान यांच्या विरोधात कॉंग्रेसचे माजी नगरसेवक सुलेमान अब्बास वल्द चिराग अली यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःचा फायदा करून घेतल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. याची जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांच्याकडे बुधवार 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सुनावणी ठेवण्यात आली आहे. 
याची सुनावणीचे नोटीस वादी व प्रतिवादींना आज सोमवारी नगर परिषदेमार्फत पाठविण्यात आले. तक्रारीप्रमाणे केलेले आरोप हे यापूर्वी सन 2015 मध्ये तत्कालीन नगरसेवक काशिनाथ प्रधान यांच्यासह कनिष्ठ अभियंता सुरेश बोरकर व नगरसेवकांचे नातेवाईक प्रियांका शिवदास प्रधान यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याचा संदर्भ घेऊन महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमान्वये नगरपालिकाच्या सदस्यपदावरून अपात्र करण्याबाबत तक्रार करण्यात आली होती. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी सुनावणी नोटीस पाठवून काशिनाथ प्रधान व सुलेमान अब्बास या दोघांना आवश्‍यक दस्तावेज व अहवालासह जिल्हाधिकाऱ्यांकडे उपस्थित राहून आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. याप्रकरणात पुढे काय निर्णय होणार याकडे कामठीकरांचे लक्ष लागले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com