सलामत रहे दोस्ताना हमारा!

वीरेंद्रकुमार जोगी : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

नागपूर : आमदार केदार आणि अनिल देशमुख पुन्हा निवडून आले असून दोघेही पाचव्यांदा विधानसभेत दाखल होणार आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द एकाचवेळी सुरू झाली असून मंत्रिमंडळाचा विचार करत देशमुख जास्तच भाग्यवान ठरले आहेत.

नागपूर : आमदार केदार आणि अनिल देशमुख पुन्हा निवडून आले असून दोघेही पाचव्यांदा विधानसभेत दाखल होणार आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द एकाचवेळी सुरू झाली असून मंत्रिमंडळाचा विचार करत देशमुख जास्तच भाग्यवान ठरले आहेत.
पाचव्यांदा विधानसभेत पोहोचणारे अनिल देशमुख व सुनील केदार यांच्यात बरेच साम्य आहे. केदार व देशमुख हे जिल्ह्यात एकमेकांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. 1995 साली जिल्हा परिषदेचे सदस्य असलेल्या अनिल देशमुख व सुनील केदार यांनी अपक्ष आमदारकीची निवडणूक लढविली होती. दोघांनीही त्यावेळच्या कॉंग्रेसच्या उमेदवारांना धूळ चारली होती. सुनील केदार यांनी माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख तर अनिल देशमुख यांनी सुनील शिंदे यांना पराभूत केले. यानंतर दोन्ही नेत्यांच्या नशिबी विजय आला नाही हे विशेष. 1995 साली युती सरकारमध्ये दोघांनाही मंत्रिपदे मिळाली. 1999 साली राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यावर दोन्ही नेते राष्ट्रवादीत सामील झाले. राष्ट्रवादीकडून सावनेरमधून लढलेल्या सुनील केदार यांना भाजपच्या देवराव आसोले यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला.
1995 पासून सतत चारवेळा आमदार होण्याचा मान अनिल देशमुख यांना मिळाला. मागील 2014 च्या निवडणुकीत त्यांचा भाजपचे आशीष देशमुख यांनी पराभव केला होता. तर 2004 साली पुन्हा अपक्ष लढून सुनील केदार यांनी विजय मिळविला. त्यानंतर ते सलग चार वेळा आमदार झाले. 2014 च्या मोदी लाटेतही केदार विजयी ठरले होते. तर अनिल देशमुख यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकीत सहाव्यांदा विधानसभा लढणाऱ्या या दोन्ही नेत्यांचे भविष्य ठरविणारी ही निवडणूक होती. दोघांनी एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला हेही विशेष. यात दोन्ही नेत्यांनी बाजी मारली आहे. महत्त्वाचे म्हणजे अनिल देशमुख व सुनील केदार यांच्या विरोधात डॉ. आशीष देशमुख यांनी भाजपकडून निवडणूक लढविली आहे. सध्या ते कॉंग्रेसमध्ये आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Welcome to our friendly!