West Vidarbha Reports 313 Farmer Death Cases in Five Months
esakal
पश्चिम विदर्भात गेल्या पाच महिन्यांत ३१३ शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. जानेवारी ते मे २०२६ या अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांत एकूण ३१३ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली आहे.