काय? कोराडीतील प्रस्तावित वीजप्रकल्प जिवावर उठणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

नागपूर : वीजप्रकल्पात जाळल्या जाणाऱ्या कोळशामुळे धोकादायक अशा सल्फरडाय ऑक्‍साइडचे उत्सर्जन सुरू आहे. मानवासह सर्वच सजीवांवर याचा परिणाम होत आहे. आता कोराडीत नवा 1,320 मेगावॉट क्षमतेचा नवीन वीज प्रकल्प प्रस्तावित आहे. हा प्रकल्प नागपूरकरांसह लगतच्या भागातील नागरिकांच्या जिवावर उठणारा ठरेल, असा सूर जनमंचतर्फे शनिवारी (ता. 21) बाबूराव धनवटे सभागृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात उमटला.

विदर्भ पर्यावरण कृती समितीचे संयोजक सुधीर पालिवाल आणि महाविदर्भ जनजागरण समितीचे संयोजक नितीन रोंघे यांनी कोराडीत प्रस्तावित नवीन औष्णिक वीज प्रकल्पांना विरोध दर्शविला. यावेळी जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे, उपाध्य राजीव जगताप उपस्थित होते. सुधीर पालिवाल यांनी औष्णिक विद्युत प्रकल्पांतील प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या दहाक परिस्थितीकडे लक्ष वेधले. औष्णिक वीज प्रकल्पात कोळसा जाळण्यात येत असल्याने सल्फरडाय ऑक्‍साइडचे मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन होते. विदेशी कोळशात सल्फरचे प्रमाण अजूनच जास्त असते. यामुळेच कोराडी प्रकल्पात सल्फरडाय ऑक्‍साईडच्या नियंत्रणासाठी यंत्रणा बसविण्याचे आदेश हरित लवादाने दिले आहेत. याला 10 वर्षांचा कालावधी लोटूनही ही यंत्रणा लावली गेली नाही. वीज प्रकल्पातील धूलिकणामुळे स्मृतिभ्रंश, कमी वयात मृत्यू यांसारखी आपत्ती ओढवली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What? Dangerous proposed power plant