वृक्षलागवडीसंदर्भात काय म्हणाले गोंदियाचे आमदार...वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

वाढदिवस, स्मृतिदिन, लग्नाचा वाढदिवस, अशा विविध कारणांवरून वृक्षारोपण करून आपल्या आप्तनातेवाइकांच्या आठवणीत वृक्ष लावून स्मृतिवन उभारण्यात आले आहे. कोरोनाशी लढताना रोगप्रतिकारकशक्‍ती वाढविण्यासाठी आपल्याला स्वच्छ हवेची आवश्‍यकता आहे. ही स्वच्छ हवा वृक्षलागवडीच्या माध्यमातूनच आपल्याला मिळणार आहे.

गोंदिया : या वसुंधरेने आपल्याला भरभरून दिले आहे. तिला अल्पसे देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वृक्षलागवड करणे होय. गेल्या पाच वर्षांत राज्यातील जनता, शासकीय व निमशासकीय कार्यालये, धार्मिक व सामाजिक संस्था आदी घटकांच्या सहकार्याने वृक्षलागवडीची मोहीम राबविली आहे. या वनमहोत्सवासह हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती, डॉक्‍टर्स डे व पोस्टल डे, असे वैशिष्ट्यपूर्ण दिवस म्हणून या दिवशी वृक्षलागवड करून वसुंधरेचे ऋण फेडण्याचा प्रयत्न सर्वांनी करू या, असे आवाहन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले.

सामाजिक वनीकरण विभागामार्फत स्मृतिवन गार्डन येथे शनिवारी (ता. 4) आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी, आमदार अग्रवाल यांनी स्मृतिवन गार्डन येथे वृक्षारोपणही केले.

वाढदिवस, स्मृतिदिन, लग्नाचा वाढदिवस, अशा विविध कारणांवरून वृक्षारोपण करून आपल्या आप्तनातेवाइकांच्या आठवणीत वृक्ष लावून स्मृतिवन उभारण्यात आले आहे. यावेळी, नगर परिषदेचे सदस्य दीपक बोबडे, वन विभागाचे उपवन संरक्षक अनंत तारसेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे, वनपाल रामटेके व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

डॉक्‍टर, पोलिस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार खरे कोरोनायोद्धा

गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, कोरोना महामारीचा सामना करताना डॉक्‍टर्स आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडत आहेत. खऱ्या अर्थाने कोरोनायोद्धा म्हणून, डॉक्‍टर्स, पोलिस कर्मचारी आणि सफाई कामगार काम करीत आहेत. पोस्टमन व पोस्टल कर्मचारीसुद्धा या प्रक्रियेत आपले योगदान देत आहेत.

हेही वाचा : मोठी बातमी : निरोगी व्यक्‍तींवर होणार कोरोना प्रतिबंधक लशीची चाचणी, नागपुरातील या रुग्णालयात सुविधा...

जनतेने साथ द्यावी

कोरोनाशी लढताना रोगप्रतिकारकशक्‍ती वाढविण्यासाठी आपल्याला स्वच्छ हवेची आवश्‍यकता आहे. ही स्वच्छ हवा वृक्षलागवडीच्या माध्यमातूनच आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे शहर हरित, स्वच्छ व सुंदर राहावे, यासाठी जनतेने साथ देण्याचे आवाहनही आमदार अग्रवाल यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What did the MLA of Gondia say about tree planting ... Read more