
वाशिम : अकोला जिल्ह्याचा दौरा आटोपून वाशीम जिल्ह्यात प्रवेश केला. सकाळे वाशीम जिल्हा बातमीदार राम चौधरी यांच्यासोबत फोनवर सविस्तर चर्चा झालीच होती. त्यानुसार प्रवासाचा मार्ग ठरविला. मालेगाव तालुक्यातील मेडशी या जिल्ह्याच्या प्रवेशद्वारी ‘सकाळ’चे मालेगाव तालुका बातमीदार प्रा. अरविंद गाभणे यांनी स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत ‘सकाळ’चे मुंगळा येथील बातमीदार अनंता कुटे होते. मेडशी येथे सरपंच शेख जमीरभाई शेख गनीभाई यांची भेट झाली. पंचायत समितीचे माजी सभापती शेख गनीभाईसुद्धा उपस्थित होते. शहरातील पाणीप्रश्न (Water question) मोठा बिकट असल्याचे उभयतांच्या बोलण्यातून लक्षात आले. पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगताच, सध्या असलेली पाणीपुरवठा योजना मेडशी गावासाठी पुरेशी नाही. आगामी ३० वर्षांचा विचार करून उर्ध्व मोर्ण प्रकल्पावरून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. शुद्धीकरण केंद्र उभारणी, नवीन पाइपलाइन, दुरुस्ती याचा समावेश या योजनेत असल्याचे जमीरभाई यांनी सांगितले. पाणीटंचाईचे नेमके कारण काय, हे जाणून घेण्यासाठी मग आम्ही पुढे निघालो. (What exactly is the cause of water scarcity?)
मालेगाव शहराचे आराध्यदैवत असलेल्या श्री ढवळेश्वर संस्थानला भेट दिली. शहराला बऱ्याच वर्षांपासून पाणीपुरवठा करणाऱ्या नळगंगा विहिरीची पाहणी केली. या विहिरीत मालेगाव लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या जवळ असलेल्या विहिरीतून पाणी सोडले जाते. त्या विहिरीची पाहणी केली. येथील पाणीपुरवठा योजना ३० वर्षांपूर्वीची असल्याने शहराच्या केवळ २५ टक्के एवढ्याच भागाला पाणीपुरवठा होत असल्याचे समजले. परिसरात मार्च महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाई जाणवते. उन्हाळा सुरू होताच भूजल पातळी खालावते. बोरवेल आटतात.
एप्रिलपासून बऱ्याच ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी चाकातीर्थ लघू पाटबंधारे प्रकल्पावरून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी नगर पंचायतीने शासन दरबारी प्रस्ताव सादर केला. या पाइपलाइनची लांबी नऊ किलोमीटर राहणार असल्याचे समजते. पाणीपुरवठा योजनेत चाकातीर्थ लघुपाटबंधारे प्रकल्पाजवळ जॅकवेल होणार आहे. मालेगाव शहरात प्रभाग तीन, पाच व १७ मध्ये पाणीपुरवठा योजनेच्या टाक्याही प्रस्तावित आहेत.
पुढील ३० वर्षे विचारात घेऊनच नवी योजना व्हावी
शहरात नवीन चांगल्या प्रतीच्या (एचडी) जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. तलावावरून पाणी आणण्यासाठी उत्तम प्रतीचे (डीआय) पाइप वापरण्यात येणार आहेत. सोलर पम्पिंगने पाणी आणण्यात येणार आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे संचालन स्वयंचलित राहणार आहे. आगामी ३० वर्षांची लोकसंख्या विचारात घेऊन ही पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. ३० कोटी ८२ लाख रुपये अंदाजित खर्चाची ही योजना आहे. तिला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता दिलेली असल्याचे समजले. या प्रकल्पावर पाणीआरक्षण १.३० एमएलडी होते. तर मालेगाव शहरासाठी ७.१० एमएलडी पाणी आरक्षित होणे गरजेचे होते. त्यामुळे प्रशासकीय मान्यता मिळण्यास अडथळा निर्माण होत होती. त्याबाबत मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन पाणी आरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे यांनी दिली.
(What exactly is the cause of water scarcity?)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.