esakal | यवतमाळ जिल्ह्यातील शेतक-याने का बनवला डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीचा पुतळा ?
sakal

बोलून बातमी शोधा

Trump love

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इवांका व जावई जेर्ड कुश्‍नेर यांच्यासह आज भारत दौऱ्यावर आले आहेत. आपल्यात असलेल्या कलेचा उपयोग ट्रम्प कुटुंबाच्या स्वागतासाठी करण्याची संकल्पना मनात आल्याचे पंकज सांगतो.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतक-याने का बनवला डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीचा पुतळा ?

sakal_logo
By
रामदास पद्मावार

दिग्रस (जि. यवतमाळ) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. ट्रम्प कुटुंबाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने ट्रम्प यांच्या मुलीचा, इवांका हिचा अर्धाकृती पुतळा तयार करून ट्रम्प कुटुंबाचे आगळे-वेगळे स्वागत केले आहे. पंकज राठोड असे त्या प्रतिभावान कलावंताचे नाव आहे. बोटांच्या जादूने त्याने बनविलेला पुतळा हुबेहुब इव्हान्काचा वाटप असल्याची प्रतिक्रिया लोकांकडून ऐकायला मिळत आहे. 

ट्रम्प कुटुंबाच्या स्वागतासाठीची संकल्पना

पंकज राठोड हा मूळचा दिग्रस येथील रहिवासी आहे. हल्ली तो महागाव तालुक्‍यातील सातघरी येथे राहतो. तो अल्पभूधारक शेतकरी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इवांका व जावई जेर्ड कुश्‍नेर यांच्यासह आज भारत दौऱ्यावर आले आहेत. आपल्यात असलेल्या कलेचा उपयोग ट्रम्प कुटुंबाच्या स्वागतासाठी करण्याची संकल्पना मनात आल्याचे पंकज सांगतो. त्याने बोटांच्या जादूई कलेचा वापर मातीला आकार देण्यासाठी केला. 

अवश्य वाचा- महिला क्रिकेटपटूने मध्यरात्री दाखविले धाडस​

इवांकाची केली हुबेहूब प्रतिकृती

कॅनव्हासवर कुंचल्यातून चित्र रेखाटन्याचा छंद असलेल्या पंकजने इवांका यांचे छायाचित्र समोर ठेवून कमळाच्या पाखळ्यांमध्ये मातीपासून अर्धाकृती पुतळ्याची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे. पंकजने यापूर्वीही अनेक ऐतिहासिक देखावे व राष्ट्रीय पुरुष, देवी, देवता, प्राणी, पक्षी आदींचे सुंदर चित्र रेखाटले असून अनेक मूर्ती तयार केल्या आहेत. त्याने या कलेचे कुठेही प्रशिक्षण घेतले नाही. एकाग्रता व छंदातूनच ही कला अवगत झाल्याचे त्याने "सकाळ'ला सांगितले. येथील शिव छत्रपती संघटनेतर्फे त्याचा "शिवगौरव' पुरस्कार व शिवतेज संस्थेतर्फे "दिग्रस गौरव' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. 

मी एक गरीब शेतकरी असल्यामुळे ट्रम्प यांच्या स्वागतासाठी जाऊ शकत नाही. त्यामुळे मी माझ्या कलेच्या माध्यमातून ट्रम्प कुटुंबियांचे स्वागत करीत आहे. 
-पंकज राठोड, 
सातघरी, ता. महागाव, जि. यवतमाळ.