Maharashtra vidhansabha 2019 : काय? अवैध दारूविक्रीसाठी "मास्टर प्लॅन'

file photo
file photo

नागपूर : निवडणूक काळात दारूचा मोठ्या प्रमाणात वापर होता. अनेकांकडून बनावट दारूची विक्री होते. निवडणूक काळात दारूविक्रीवर नियंत्रणासोबत अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून "मास्टर प्लॅन' तयार करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीत उत्पादन शुल्क विभागाने उत्तम कामगिरी केली होती. याची दखल वरिष्ठांनी घेतली. विधानसभा निवडणुकीत दारूविक्री व अवैध दारूविक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष तयारी केली आहे. खुर्सापार, केळवद, सिरोंजी बडेगाव, चोरखैरी या ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले. मध्य प्रदेश आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यातील पाच किमी परिसरातील मद्य विक्री ठिकाणे बंद करण्यात येणार आहे. तसेच सीमेवरील भागात सीसीटीव्हीही लावण्याचे नियोजन आहे.
दारूनिर्मितीचे ठिकाण आणि गोदामातसुद्धा सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. याच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना हालचाली पाहता येतील. त्याचप्रमाणे दारू दुकान आणि वाईन शॉपमध्येही सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले आहे. विभागाकडून अवैध दारूविक्री करणारे संशयित हॉटेल्स, धाब्यांचीही यादी केली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात हातभट्टी दारू तयार करणाऱ्या 20 ठिकाणांची नकाशासहित यादी तयार केली आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारची तयारी विभागाने केली आहे. अवैध दारूविक्री केंद्रावर कारवाईसाठी विशेष बंदोबस्त लावण्यात येणार आहे. यासाठी सहा. पोलिस निरीक्षक व भरारी पथक तयार केले आहे. त्याचप्रमाणे 102 होमगार्ड व सात वाहनांची मागणी विभागाने निवडणूक विभागाकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com