''क्या हुवा तेरा वादा'' : धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

मुख्यमंत्र्यांकडून धनगर समाजाला आरक्षण देणार की नाही ही स्पष्टता आम्हाला 97 च्या चर्चेत अपेक्षित आहे. धनगर समाजाच्या आरक्षणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराव वडकुते यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेत ते बोलत होते. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी सरकारच्या धोरणावर शरसंधान साधले.

नागपूर : मुख्यमंत्री पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देणार होते, शेकडो बैठका झाल्या, आता सांगा ''क्या हुवा, तेरा वादा,'' असे विचारत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली

मुख्यमंत्र्यांकडून धनगर समाजाला आरक्षण देणार की नाही ही स्पष्टता आम्हाला 97 च्या चर्चेत अपेक्षित आहे. धनगर समाजाच्या आरक्षणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराव वडकुते यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेत ते बोलत होते. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी सरकारच्या धोरणावर शरसंधान साधले.

'टीस' ही स्वायत्त संस्था आहे. या संस्थेला कोणताही घटनात्मक अधिकार किंवा दर्जा नसताना त्यांनी दिलेला अहवाल कायदेशीर पातळीवर कसा ग्राह्य मानला जाईल, अशी शंका धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली व सरकार या संस्थेच्या नावाखाली धनगर समाजाची फसवणूक करीत आहेत असा आरोप केला.

सरकारचे मंत्री विष्णू सावरा यांनी धनगर समाजाला आरक्षण देता येणार नाही, असे सांगितले होते आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परवा धनगर समाजाच्या आरक्षणाच्याविरोधात बोलले होते. यांचे सर्वोच्च नेते विरोधात बोलत असतील तर राज्याचे मंत्री कसे आरक्षण देणार असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला.

Web Title: What is your promise says Dhananjay Munde to Chief Minister questioned