Video : अभिनंदनीय ! व्हॉट्‌सऍप गृपने केले आदर्श कार्य

whats app.j
whats app.j

यवतमाळ : अलिकडे व्हॉट्‌स ऍप गृप्सचा सुळसुळाट झाला आहे. नातेवाईकांचे, संस्थांचे, मित्रमैत्रिणींचे, साहित्यिक, सांस्कृतिक, ऑफीसचे असे प्रत्येकाचे कमीतकमी 15-20 तरी गृप्स असतातच. आणि सुरुवातीचे नवलाईचे दिवस संपले की मग प्रत्येक गृपचे शुभ सकाळ, शुभ रात्री आणि फॉरवर्डेड एवढेच स्वरुप उरते. आणि हे गृप्स कंटाळवाणे होतात. मात्र त्यातून बाहेरही पडता येत नाही, कारण ज्याने ऍड केले असते, तो दुखावला जातो. आणि हे गृप्स केवळ डोकेदुखी होऊन बसतात.

मात्र एका व्हॉट्‌स ऍप गृपने उत्कृष्ट सामाजिक कार्य करून समाजासमोर आदर्श उभा केला आहे. अनुकरणप्रिय समाजाने या कृतीचा आदर्श ठेऊन व्हॉट्‌स ऍपच्या माध्यमातून असे कार्य केले तर नक्‍कीच व्हॉट्‌स ऍप गृप फायद्याचे ठरतील.



शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ या कॉलेजचा सन 1995 ते 2000 या बॅचने आपल्या मित्रमैत्रिणींचा "गोळा गोतावळा" या नावाचा व्हाट्‌सअँप गृप तयार केला. 1 में 2015 ला तयार केला नंदु उर्फ साहेबराव सुदामराव गुडधे हे या गृपचे ऍडमिन आहेत. या गृपमध्ये 150 च्या वर सदस्य आहेत. काही दिवसापूर्वी याच ग्रुपमधील स्थापत्य अभियंता आतिक खान यांचे कॅन्सरमुळे निधन झाले व संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मित्राच्या निधनाने गृपमध्यहीे शोककळा पसरली. गेलेला जीव तर पुन्हा येणार नाही पण मित्रत्वाच्या नात्याने कुटुंबाला काही मदत करता येईल का अशी कल्पना काहींना सुचली व त्यांनी अड्‌म्÷िम्÷म्÷म्÷म्÷म्÷मनला तशी विचारणा केली. अडॅमिनने लगेच होकार देऊन तसा मेसेज गृपवर टाकला आणि अवघ्या दोन ते तीन दिवसात गृपमधील मित्रांनी प्रचंड प्रतिसाद देत खात्यात 1,05,000/- (एक लाख पाच हजार) एवढी रक्कम जमा केली.

यामध्ये काही महिलांचाही सहभाग होता. जमा झालेल्या रकमेतून आतिक खान यांच्या मुलाच्या व मुलीच्या नावाने पन्नास-पन्नास हजारांचे फिक्‍स्ड डिपॉसिट केले व बाकी उरलेली रक्कम 5000/- त्यांच्या कुटुंबाच्या सुपूर्द केली. यावेळी अतुल श्रीराव, निलेश सोनटक्के,वाजीद खान, देवेश राऊत, विजय संकोचवार, प्रवीण पावशेकर, विजय वानखडे आदी मित्र उपस्थित होते.

सविस्तर वाचा - तुकाराम मुंढे यांनी या वादाविषयी केला मोठा खुलासा...

व्हॉट्‌सऍप गृपचा उपयोग नुसताच मनोरंजनाकरिता न करता आपण त्या माध्यमातून समाजाचे काही देणे लागतो, ही सामाजिक जाणीव ठेऊन समाजपयोगी कार्य करू शकतो व इतरांनाही असे कार्य करण्यासाठी प्रेरित करू शकतो असे या गृपचे अड्‌म्÷िम्÷म्÷म्÷म्÷म्÷मन नंदु उर्फ साहेबराव सुदामराव गुडधे यांनी सांगितले व ही छोटीशी मदत हिच मित्राला श्रद्धांजली असून व्हॉट्‌स ऍप गृपचा उद्देश सफल झाला असे कळविले व गृपमधील सदस्यांचे आभार मानले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com