जेंव्हा जिल्हाधिकारी तिफन हाकतात

विवेक मेतकर
बुधवार, 20 जून 2018

जिल्ह्यात पेरणीची लगबग सुरू आहे. पेरणीच्या कालावधीत अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय हे एका वेगळ्याच भूमिकेत आज अकोलेकरांना पहायला मिळाले. त्यांच्या या कृत्यामुळे अकोल्यात आस्तिक कुमार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मंगळवारी थेट तिफन हातात धरत पेरणीचा सुखद अनुभव घेतला. यावेळी त्यांच्या सोबत मूर्तिजापूरचे आमदार हरिष पिंपळे हे उपस्थित होते. 

अकोला - जिल्ह्यात पेरणीची लगबग सुरू आहे. पेरणीच्या कालावधीत अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय हे एका वेगळ्याच भूमिकेत आज अकोलेकरांना पहायला मिळाले. त्यांच्या या कृत्यामुळे अकोल्यात आस्तिक कुमार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मंगळवारी थेट तिफन हातात धरत पेरणीचा सुखद अनुभव घेतला. यावेळी त्यांच्या सोबत मूर्तिजापूरचे आमदार हरिष पिंपळे हे उपस्थित होते. 

आमदार पिंपळे यांनी पेरणीचं सरतं हातात धरत जिल्हाधिकारी पाण्डेय यांना साथ दिली. पाण्डेय यांच्या या भुमिककेने प्रशासनात देखील कौतुक होत आहे. मूत्रिजापूर तालुक्यातील सोनाळा या गावात जिल्हाधिककारी पाण्डेय आणि आमदार पिंपळे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात पेरणीचा मनसोक्त आनंद घेतला. थेट शेतात जावून पेरणीचा अनुभव घेणाऱ्या पाण्डेय यांना आता नवी ओळख मिळाली असून त्यांची शेतकरी जिल्हाधिकारी अशी ओळख निर्माण झाली आहे. पाण्डेय यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी शेतीचा यशस्वी प्रयोग केला असून त्यातून त्यांनी आपले निवासस्थान स्वयंपूर्ण केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शेतकऱ्यांना वेळेत पिककर्ज न देणाऱ्या एका खासगी बँकेला झटका दिला होता.

Web Title: When the district collector goes to farm for work