जेव्हा सत्ताधारीच ‘ठिय्या’ मांडतात...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

अकोला : महापालिकेत, राज्यात आणि केंद्रातसुद्धा सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या अकोल्यातील पदाधिकाऱ्यांना रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या द्यावा लागला. बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने कार्यकारी अभियंत्यांना भाजप महानगराध्यक्षांनी चांगलेच धारेवरही धरले.   

शहरातील रस्त्यांची दुर्दशा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे झाली. त्यामुळे नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. जनतेच्या या समस्यांसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनीच आता रस्त्यावर उतरून प्रशासनाचा गलथान कारभार उघड करण्याची सूचना खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांनी केली. त्यानुसार महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. तीन तास ठिय्या दिल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भाग पाडले. येत्या ६ दिवसात १२ रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन कार्यकारी अभियंत्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

Web Title: when government come on agitation