'त्या' आईचं बाळ कधी मिळणार!

सिद्धेश्वर डुकरे
मंगळवार, 17 जुलै 2018

नागपूर : प्रत्येकाला आपलं बाळ लाडकं असतं. ती माता रोज पोलीस स्टेशनला चकरा मारत आहे. पोलिसांना विचरत आहे "सापडलं का हो माझं बाळ" आणि आर्त टाहो फोडत आहे. त्या मातेला तिचे बाळ कधी भेटणार, आज सहा महिने उलटले तरी तिचे बाळ मिळत नाही. तिला तिचे बाळ कधी मिळणार, असा सवाल औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत केला असता सभागृहात शांतता पसरली.

एरवी सरकारला धारेवर धरत आगपाखड करणारे विरोधक आणि त्याचा सामना करणारे सत्ताधारी आमदार निशःब्द झाले. ही घटना आहे सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णल्यातील नवजात बलिकेचे 31 जानेवारी 2018 रोजी नवजात बलिकेचे अपहरण झाले. या रुग्णालयात सीसीटीव्ही बंद होता. बुरखाधारी महिलेने नवजात बालिकेच्या आईशी तासभर बोलत मैत्री केली आणि विश्वास संपादून बाळ चोरले. पोलीस तपास करीत आहेत मात्र आद्यप या बाळाचा ठावठिकाणा लागला नाही. याबाबत लिखित प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मुख्यमंत्री यांनी तपास सुरू आहे. काही धागेदोरे मिळाले आहेत. लवकरच बाळ चोरलेल्या महिलेला अटक केली जाईल असे सदनात सांगितले.

Web Title: when that mother gets her baby