esakal | सांगा, झाडीपट्टीतील रंगमंचांचे पडदे केव्हा उघडता? झाडीपट्टी नाट्यमहामंडळाच्या शिष्टमंडळाची मंत्रालयात धाव
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जवळपास पाच हजार कलावंत पूर्व विदर्भातील झाडीपट्टीमध्ये दिवाळीनंतर मंडईनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मनोरंजन, जनजागृती व समाज प्रबोधनाचे काम करतात. नाटक, तमाशा, गोंधळ, दंडार, लावणी नृत्य, भजनस्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचा यात समावेश आहे. हेच त्यांचे उपजीविकेचा मुख्य साधन आहे. मात्र कोरोनामुळे त्यांचा रोजगार हिरावला आहे.

सांगा, झाडीपट्टीतील रंगमंचांचे पडदे केव्हा उघडता? झाडीपट्टी नाट्यमहामंडळाच्या शिष्टमंडळाची मंत्रालयात धाव

sakal_logo
By
राधेश्‍याम कवरे

डव्वा (जि. गोंदिया) : सुमारे दीडशे वर्षांपासून चालत आलेली पूर्व विदर्भातील झाडीपट्टीची परंपरा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मोडण्याच्या वाटेवर आहे. लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. त्यामुळे काम मिळून उदरनिर्वाहाचा प्रश्‍न मिटावा, याकरिता नाटकांना तत्काळ परवानगी द्यावी, अशी मागणी झाडीपट्टी नाट्यमहामंडळाच्या शिष्टमंडळाने केली आहे. याकरिता त्यांनी थेट मंत्रालयात धाव घेत विधानसभा अध्यक्षांसह मंत्र्यांना निवेदन दिले आहे.

जवळपास पाच हजार कलावंत पूर्व विदर्भातील झाडीपट्टीमध्ये दिवाळीनंतर मंडईनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मनोरंजन, जनजागृती व समाज प्रबोधनाचे काम करतात. नाटक, तमाशा, गोंधळ, दंडार, लावणी नृत्य, भजनस्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचा यात समावेश आहे. हेच त्यांचे उपजीविकेचा मुख्य साधन आहे. मात्र कोरोनामुळे त्यांचा रोजगार हिरावला आहे.

मंडईनिमित्त होणारे कार्यक्रम पूर्ववत सुरू करा

परंतु, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे या सर्वच कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. कित्येकांचे संसार उघड्यावर येण्याच्या मार्गावर आहेत. तर अनेकांनी दुसरा रोजगार शोधण्यासाठी शहरांकडे धाव घेतली आहे. मात्र कोरोनाच्या विळख्यामुळे त्यांचे स्थलांतर फिके पडले आहे.

अवश्य वाचा : पर्यटकांनो, चला नागझिऱ्याला जाऊया! 1 नोव्हेंबरपासून पर्यटनासाठी खुले; पशू,पक्ष्यांचा आवाज कानी घुमणार

दरम्यान, मंडईनिमित्त होणारे कार्यक्रम पूर्ववत सुरू झाले तर ही वेळ कलावंतांवर येणार नाही. म्हणून सर्वच क्षेत्रातील कलावंतांनी आपापल्या सोयीनुसार आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिली.

कलावंतांवर उद्धवलेल्या परिस्थितीची जाण

परंतु, शासनाकडून पाहिजे तसा प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. त्यामुळे झाडीपट्टी नाट्यमहामंळाचे पदाधिकारी अनिरुद्ध वनकर, चेतन वळगाये, किरपाल सय्याम, संदेश आनंदे यांनी शिष्टमंडळांसह थेट मंत्रालयात धाव घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, बांधकाममंत्री अशोक चव्हाण, सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांना निवेदन दिले. पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन लॉकडाउनमुळे कलावंतांवर उद्‌भवलेली परिस्थितीची जाणीव त्यांना करून दिली.

जाणून घ्या :  प्रेरणादायी! एका पोलिस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाने गावखेड्यातील तरुण लागले स्पर्धा परीक्षेच्या तयारीला

नाटकाचा पडदा उघडण्याची आशा

शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी या विषयावर सखोल चर्चा केली आहे. त्यांनी यावर सकारात्मकता दाखविली. त्यामुळे लवकरच रंगभूमीवरील नाटकाचा पडदा उघडेल, अशी आशा झाडीपट्टीतील सर्वचस्तरावरील कलावंत व नाट्यरसिकांनी व्यक्त केली आहे.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)