आंबाडीचा अशोक गेला कुठे?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

रविवारी दुपारी एकच्या सुमारास नागनदीवर पाण्याची मोटर क्रेनद्वारे बसवण्याचा प्रयत्न करत असताना अशोक पाण्यात बुडाले असल्याची घटना पोलिस विभागाकडून सांगण्यात आली. 36 तास उलटून अजूनपर्यंत म्हणजे सोमवारीसुद्धा तो कुठेच आढळला नाही. त्याच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. ते घरी परत न आल्याने ते गेलेत कुठे, ही चिंता दर्शवली जात आहे.

पचखेडी(जि.नागपूर) : कुही तालुक्‍यातील आंबाडी येथील अशोक सीताराम मडावी (वय 35) हे नागपूर येथील रहिवासी पुंजडी यांच्या नागनदी शेजारी असलेल्या शेतात मोटार पंपिंग लावण्यासाठी गेले होते. रविवारी दुपारी एकच्या सुमारास नागनदीवर पाण्याची मोटर क्रेनद्वारे बसवण्याचा प्रयत्न करत असताना ते पाण्यात बुडाले असल्याची घटना पोलिस विभागाकडून सांगण्यात आली. 36 तास उलटून अजूनपर्यंत म्हणजे सोमवारीसुद्धा तो कुठेच आढळला नाही. त्याच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. ते घरी परत न आल्याने ते गेलेत कुठे, ही चिंता दर्शवली जात आहे. त्यांच्यासाबेत गेलेले सर्व घरी परत आलेत. संपूर्ण गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचा बुडून मृत्यू झाला की काय, अशी शंकाही व्यक्‍त केली जात आहे.

ते नागनदीत बुडाले असावे, या शंकेचे निरसन करण्याकरिता एनडीआरएफची चमू पाचारण करून मडावी यांचा शोध घेणे सुरू आहे. मात्र, अशोक मडावी यांचा मृत्यू झाला की नाही, असे तर्ववितर्क लावण्यात येत आहे.सोमवारी (ता.18) कुही तालुक्‍यातील आंबाळी या गावातील रहिवासी अशोक सीताराम मडावी यांचा रविवारी नागनदीत विद्युतपंप लावत असताना त्यांचा अपघात झाल्यामुळे ते नागनदीमध्ये बुडाले. त्यामुळे त्यांचा अद्यापपर्यंत पत्ता न लागल्याने उमरेड क्षेत्रातील आमदार राजू पारवे यांनी घटनास्थळी भेट दिली व कुही तहसीलदार अंबादे, पोलिस निरीक्षक कुही, एनडीआरएफच्या चमूला त्यांना शोधण्याच्या सूचना दिल्या.याप्रसंगी महादेव जिभकाटे, अंबादास लांजेवार, विनोद बावनकुळे, अरुण गोरले, अरविंद हजारे, योगेश गोरले, भास्कर सूर्यवंशी, बाळू मडावी, कैलास वंजारी, राहुल वंजारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where did the mango stall go?