पालकमंत्री बावनकुळे कुठून लढणार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

नागपूर : पालकमंत्री तसेच राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने काटोलमधून लाढण्यास सांगितल्याचे वृत्त आहे. याच कारणामुळे कामठी विधानसभेचा उमेदवार जाहीर करण्यात आला नसल्याचे समजते. दुसरीकडे रामटेकमधून त्यांना लढण्याचा आग्रह होत असल्याचेही सांगण्यात येते.

नागपूर : पालकमंत्री तसेच राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने काटोलमधून लाढण्यास सांगितल्याचे वृत्त आहे. याच कारणामुळे कामठी विधानसभेचा उमेदवार जाहीर करण्यात आला नसल्याचे समजते. दुसरीकडे रामटेकमधून त्यांना लढण्याचा आग्रह होत असल्याचेही सांगण्यात येते.
कामठी विधानसभा मतदारसंघ बावनकुळे यांनी भाजपच्या ताब्यातून आपल्याकडे खेचून आणला. सलग तिसऱ्यांदा ते येथून निवडून आले आहे. राज्याचे ऊर्जा व पालकमंत्री या नात्याने कोट्यवधींचे विकासकामे करून त्यांनी आपला मतदारसंघ आणखीच बळकट केला आहे. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचा एकही बडा नेता लढण्यास तयार नाही इतकी ताकद त्यांनी आपली येथे तयार केली आहे. सध्या ते भाजपचा हुकमाचा एक्का झाला आहेत.
जिल्ह्यातील कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून निवडून येतील इतका दबदबा त्यांनी निर्माण केला आहे. कोट्यवधींची विकासकामे आणि कार्यकर्त्यांच्या फळीच्या भरोशावर कामठी ते सहज जिंकतील याच भाजपलाही शंका नाही. त्यामुळे त्यांना काटोल विधान सभेत पाठवून अनिल देशमुख यांना पराभूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली असल्याचे समजते. ते रामटेक मतदारसंघातूनही लढू शकतात. आज त्यांनी रामटेकच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चाचपणी केल्याची चर्चा आहे. बावनकुळे विदर्भातील पहिले ऊर्जामंत्री आहेत. सर्वाधिक कार्यक्षम मंत्र्यांच्या नावामध्ये त्यांचा समावेश आहे. मात्र, ऐनवेळी पक्षातर्फे काटोल लढण्यास सांगण्यात आल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. ते आता कुठून लढतात याकडे सर्वांचे लागले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where will Guardian Minister Bawanule contest ?