फेसबुक फ्रेंडशिप विधवेला नडली

Facebook
Facebook

नागपूर - फेसबुकद्वारे मैत्री केल्यानंतर प्रेमसंबंध प्रस्थापित केलेल्या मजनूला लग्नास नकार देणे एका विधवा महिलेला चांगलेच महागात पडले. ४० वर्षीय पीडित महिलेहून वयाने १३ वर्षे लहान असलेल्या त्या मजनूने फेसबुकवर पीडितेचे अश्‍लील व्हिडिओ व्हायरल करून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिस ठाणे गाठून महिलेने आरोपी अक्षय ऊर्फ रणविजय शेखर गणवीर (२७, रा कॉसमॉस सोसायटी, सोमलवाडा) याच्याविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. 

प्राप्त माहितीनुसार, खासगी कंपनीत काम करणारी पीडित महिला विधवा असून ती दोन मुलांसोबत गिट्टीखदान परिसरात राहते. तर अक्षय हा सेल्समॅन आहे. १ जानेवारी २०१८ रोजी अक्षयची महिलेसोबत फेसबुकवरून ओळख झाली. पतीचे निधन झाल्याचे दुःख तिने अक्षयला सांगितले. यानंतर त्या दोघांची मैत्री व नंतर प्रेमसंबंध झाले. या दरम्यान दोघेही प्रियकर-प्रेयसीप्रमाणे राहू लागले. त्याने काही तिचे मोबाईलने अश्‍लील व्हिडिओ काढले. त्यांच्या प्रेमाला वर्ष लोटल्यानंतर अक्षय हा नेहमी महिलेला लग्नासाठी आग्रह करीत होता. मात्र, ती वयाने तेरा वर्षाने लहान असलेल्या अक्षयला लग्नास नकार देत होती. यामुळे चिडलेल्या अक्षयने पीडितेसह नातेवाईकांना तिची अश्‍लील चित्रफीत पाठवून शिवीगाळ केली. तसेच अक्षयने पीडितेच्या मुलांना जिवे मारण्याची धमकीही दिली. अक्षयने गंभीर पाऊल न उचलावे म्हणून तिने थेट गिट्टीखदान पोलिस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दिली पोलिसांनी आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा नोंदवीत त्याला अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com