'ती' उपचारादरम्यान म्हणाली दोन पैसे जमा करा, मुलांचा सांभाळ करा

Wife commits suicide at Nagpur
Wife commits suicide at Nagpur

नागपूर : माझ्या मुलाचा पतीने चांगल्या प्रकारे सांभाळ करावा. दोन्ही मुलींनासुद्धा चांगले शिक्षण द्यावे. मुलांच्या भविष्याची काळजी करावी. मुलांच्या भविष्यासाठी दोन पैसे जमा करून खर्च भागवावा. मी तर आता शेवटच्या घटका मोजते आहे. परंतु, मी गेल्यानंतर माझ्या मुलांची पूर्णपणे जबाबदारी पतीने योग्यपणे पार पाडावी, अशी शेवटची इच्छा मृत नीलम खाजाप्रसाद वाडवे (वय 28, रा. गोंड मोहल्ला, गिट्टीखदान) हिने व्यक्‍त केली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती खाजाप्रसाद वाडवे हा मनपाच्या कचरा संकलन प्रोजेक्‍टमध्ये सफाई कर्मचारी पदावर काम करतो. त्याचे 2009 मध्ये नीलमशी लग्न झाले. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. खाजाप्रसादला दारूचे व्यसन आहे. अनेकदा पती-पत्नीत याच कारणावरून वाद झाला. तो रोज दारू पिऊन घरी यायचा आणि पत्नीशी वाद घालायचा. मुलांसमोर मारहाणही करायचा. दारू आणि रोजच्या मारहाणीमुळे पत्नी नीलम कंटाळली होती.

नातेवाइकांनी समजूत घातल्यानंतर काही दिवस संसार सुरळीत सुरू होता. परंतु, खाजाप्रसाद हा दारू सोडायला तयार नव्हता. सोमवारी रात्रीला नीलमचे पतीसोबत भांडण झाले. पतीच्या त्रासाला कंटाळून नीलमने मंगळवारी सकाळी अंगावर रॉकेल घेऊन पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मेयो हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. 

मुलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करा

तुमच्या दारूच्या सवयीमुळे त्रासल्यानेच मी आत्महत्येचा प्रयत्न केला. मी आता शेवटच्या घटका मोजते आहे. मी गेल्यानंतर माझ्या मुलांची पूर्णपणे जबाबदारी पतीने योग्यपणे पार पाडावी, अशी शेवटची इच्छा नीलमने व्यक्‍त केली होती.

युवकाने घेतला गळफास

बिनाकी मंगळवारीतील शाहू मोहल्ला येथे 31 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मनोज बाबूराव काटेमोरे, असे मृताचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. यशोधरानगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com