Buldhana Crime : पोलिस कर्मचार्‍याकडून पत्नीचा छळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Buldhana Crime : पोलिस कर्मचार्‍याकडून पत्नीचा छळ

Buldhana Crime : पोलिस कर्मचार्‍याकडून पत्नीचा छळ

बुलडाणा : पोलिस कर्मचार्‍याने माहेरवरुन 10 लाख रुपये आणण्यासाठी पत्नीचा छळ केल्याची तक्रार पिडीतेने चिखली पोलिसात दिली आहे. या तक्रारीवरून आरोपी पती श्रीकांत पांढरे नागपूर विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: नक्षलवादाला शहरी चेहरा देण्याचा मिलिंद तेलतुंबडेचा प्रयत्न

तक्रारीत, पीडित महिलेचे माहेर चिखली तालुक्यातील केळवद येथे असून 2020 मध्ये तिचे लग्न नागपूर येथे कार्यरत पोलिस कर्मचारी श्रीकांत पांढरे यांचेसोबत झाले. लग्नानंतर काही दिवसातच श्रीकांत पांढरे याने माहेरवरुन 10 लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. तसेच शारीरिक व मानसिक छळ देखील केला. दरम्यान, सदर कर्मचार्‍याचे नागपूर येथे कार्यरत एक महिला पोलिस कर्मचार्‍याशी संबंध असल्याची बाब विवाहितेला कळली. विवाहबाह्य संबंध असलेली सदर महिला पोलिस दलात कार्यरत आहे. तिला पोलिस कर्मचारी पांढरे याने लग्नाचे आमिष दाखविले.

हेही वाचा: हस्ताक्षरावरून पटली ओळख? गडचिरोलीच्या चकमकीत 'ते' चौघे ठार?

तिने नागपूर पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचे पिडीतेला कळताच तुझ्या आजीची तब्येत ठीक नाही, कारण पुढे करीत पोलिस कर्मचारी पांढरेने पत्नीला केळवद येथे माहेरी सोडून दिले. यामध्ये आपली मोठी फसवणूक झाल्याचे पिडीतेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यावरून चिखली पोलिसांनी आरोपी पती श्रीकांत पांढरे, उषा पांढरे, संगीता पांढरे, समाधान पांढरे, राजू पांढरे, दीपाली विजय पाटील, विजय पाटील, किशोरी बोराडे, प्रदीप बोराडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास जमादार चेके करीत आहे.

loading image
go to top