esakal | पतीने आणली सवत, असह्य होऊन तिने घेतले विष
sakal

बोलून बातमी शोधा

poison

 तेरा वर्षापू्र्वी लग्न होऊन पत्नी व दोन मुलांसह कुटुंबात सुखी जीवन जगताना पतीने गावातीलच अन्य एका युवतीशी प्रेमसंबंधातून  तीन महिन्यापूर्वी दुसरे  लग्न केल्याने मानसिक तणावात असलेल्या महिलेने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली.

पतीने आणली सवत, असह्य होऊन तिने घेतले विष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लाखांदूर (जि. भंडारा) : संसार वेलीवर दोन फुले उमलली होती. सुखाचा संसार सुरू होता. कोणाची नजर लागली आणि पतीने दुसरे लग्न केले. हा अपमान तिला जिव्हारी लागला. व तिने विष जवळ केले. एखाद्या सिनेमात शोभावी अशी घटना नुकतीच घडली.
 तेरा वर्षापू्र्वी लग्न होऊन पत्नी व दोन मुलांसह कुटुंबात सुखी जीवन जगताना पतीने गावातीलच अन्य एका युवतीशी प्रेमसंबंधातून  तीन महिन्यापूर्वी दुसरे  लग्न केल्याने मानसिक तणावात असलेल्या महिलेने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे आज सकाळी सात वाजता घडली.
 उर्मिला प्रमोद जिभकाटे (वय ४२) असे महिलेचे नाव आहे. पोलिस सूत्रांनुसार उर्मिलाचे तेरा वर्षांपू्र्वी प्रमोद याच्याशी लग्न झाले होते. त्यांना वेदांती (वय ११) ही मुलगी व विश्वजीत हा (वय ६) मुलगा आहे. चौघेही गुण्यागोविंदाने जीवन जगत होते. परंतु, पती प्रमोद याचे गावातीलच अश्विनी नामक युवतीशी सूत जुळले. तीन महिन्यापूर्वी त्याने दुसरे लग्न केले. पती प्रमोद हा गावातच उर्मिला व अश्विनी या दोघींसह  दोन वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. पतीच्या दुस-या लग्नावरुन उर्मिला तणावात होती. यातच तिने टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सविस्तर वाचा - गर्भवती मातांना सारीसह कोरोनाचा धोका, अशी घ्यावी काळजी

परंतु, मृताच्या नातलगांनी त्यावर आक्षेप घेतल्याची माहिती आहे. या घटनेचा तपास लाखांदूरचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संदीप ताराम करीत आहेत.