esakal | तीस लाखांचा दारूसाठा जप्त; एलसीबीची दोन ठिकाणी कारवाई; तीन दारू तस्करांना अटक

बोलून बातमी शोधा

null

तीस लाखांचा दारूसाठा जप्त; एलसीबीची दोन ठिकाणी कारवाई; तीन दारू तस्करांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यात दोन ठिकाणी दारू तस्करांविरुद्ध कारवाया केल्या आहेत. या कारवाईत दारुसाठा आणि वाहन असा सुमारे 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तीन दारू तस्करांना अटक करण्यात आली आले. या दोन्ही कारवाया स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आल्या.

हेही वाचा: "मजबूर है तो क्या हुआ १५ मिनिट मे बेड इनका होगा"; नागपूरच्या मजुरासाठी सोनू सूदचा मदतीचा हात

भद्रावती-चंद्रपूर हायवे मार्गावरील एमआयडीसी ताडाळी चौक परिसरात दारू तस्करी होत असल्याच्या माहितीवरून छापा टाकण्यात आला. यावेळी एमएच 31 बीसी 6810 क्रमांकाच्या चारचाकी वाहनांची तपासणी केली असता लाखो रुपये किमतीचा 71 पेट्या देशी, विदेशी दारुसाठा आढळून आला. पोलिसांनी दारुसाठा आणि वाहन असा सुमारे 19 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अजय वामन हजारे याला अटक करण्यात आली.

पोलिसांनी अजय हजारे आणि बंडू आंबटकर यांच्यावर गुन्हे दाखल केले. दुसरी कारवाई चिमूर पोलिस ठाणे हद्दीतील नेरी-मोटेगाव मार्गावर करण्यात आली. यावेळी आकाश बबन सुकलंकर, जगदीश नरेश विजयनगरम याला अटक करण्यात आली. या दोघांसह अवी नावरखेले, नितीन नावरखेडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

हेही वाचा: दिलासा! बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक; एकाच दिवशी ७२६६ कोरोनामुक्त

यावेळी 24 पेट्या विदेशी दारूसाठा आणि एमएच 14 एफएम 2472 क्रमांकाचे वाहन असा सुमारे 10 लाख 45 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

संपादन - अथर्व महांकाळ