आज सायंकाळच्या धाब्यातील तस्कर सुमारास तेलंगणातून बाईकने दारू घेउन येत होता. दारूतस्करी करतांना त्याने बरीच ढोसली.अनं गावाजवळ येताच बाईकवरून त्याचा तोल गेला. जवळपाच चार पेटया दारूचा सडा मार्गावर पडला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली.
चंद्रपूर: दारूबंदीला पाच वर्ष लोटली पण राजरोसपणे दारूविक्री सुरू आहे. गोंडपिपरी तालुक्याला लागून तेलंगणाची सिमा आहे.छुप्या मार्गाने या मार्गातून दारूतस्करी होते. पण धाब्यातील काही दारूतस्कर आता दिवसाढवळया तस्करी करू लागले आहेत.
जाणून घ्या -मदतीच्या बहाण्याने महिलेला बेशुद्ध करून केला अत्याचार; डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
आज सायंकाळच्या धाब्यातील तस्कर सुमारास तेलंगणातून बाईकने दारू घेउन येत होता. दारूतस्करी करतांना त्याने बरीच ढोसली.अनं गावाजवळ येताच बाईकवरून त्याचा तोल गेला. जवळपाच चार पेटया दारूचा सडा मार्गावर पडला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली.
इकडे तळीराम तस्कराने आपल्या सहकार्याना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अन मग काय रस्त्यावर पडलेली दारू जमा करण्यात ते गुंतले. गावातील माजी सरपंच घटनास्थळी दाखल झाले. यावेळी दारूतस्करांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. शेवटी बÚयाच वेळानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
रस्त्यावर पडलेला दारूसाठा जप्त करण्यात आला.याप्रकरणी प्रविण घोगरे याला ताब्यात घेण्यात आले. दारू मार्गावर पडल्यानंतर तस्कराकडून दारू जमा करतांनाचा व्हिडीओ लगेच व्हायरल झाला अनं या प्रकाराची जोरात चर्चा समाजमाध्यमात रंगली.
संपदान - अथर्व महांकाळ