ड्रॅगन चषक जिंकणे ही ऐतिहासिक उपलब्धी

ड्रॅगन चषक जिंकणे ही ऐतिहासिक उपलब्धी

नागपूर : "होमलेस वर्ल्डकप'अंतर्गत खेळल्या गेलेल्या ड्रॅगन चषक स्पर्धेत विजेतेपद मिळविणे ही भारतीय होमलेस पुरुष फुटबॉल संघासाठी ऐतिहासिक उपलब्धी असून, यामुळे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळून भविष्यात होमलेस फुटबॉलला फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया, क्रीडा विकास मंचचे संस्थापक प्रा. विजय बारसे यांनी व्यक्‍त केली.
विजेत्या भारतीय संघाच्या सत्कार समारंभात बोलताना प्रा. बारसे म्हणाले, कार्डिफ (वेल्स) येथे झालेल्या 17 व्या ड्रॅगन चषक स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने जर्मनीचा 6-4 गोलने पराभव करून विजेतेपद मिळविले, तर महिला संघाने सातवे स्थान पटकाविले. भारताने पहिल्यांदाच ड्रॅगन चषक जिंकावा, ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. विदेशी संघांच्या तुलनेत फारशा सोयी-सुविधा नसतानाही केवळ जिद्द व मेहनतीच्या भरवशावर भारतीय संघाने हे ऐतिहासिक यश मिळविले. या विजेतेपदामुळे युवा खेळाडू आकर्षित होऊन फुटबॉलची भरभराट होईल, असे ते म्हणाले.
भारतीय संघासोबत प्रशिक्षक म्हणून गेलेले ऍड. अभिजित बारसे म्हणाले, भारतीय संघाची स्पर्धेतील कामगिरी अतिशय देखणी राहिली. खेळाडूंनी एकजुटता दाखवीत अनेक तगड्या संघांना पराभूत केले. उल्लेखनीय म्हणजे, स्पर्धेदरम्यान भारतीय संघाने खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन केले. त्यामुळेच दोन खेळाडूंना "फेअरप्ले अवॉर्ड' मिळू शकला. महिला संघाच्या व्यवस्थापक शिबा मार्कस यांनी खेळाडूंसाठी हा अनुभव अविस्मरणीय राहिल्याचे सांगितले. हंगेरीत प्रशिक्षण देणारे एहसान कमाल, शिवानी चौधरी व देविका सेन यांच्यासह भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागपूरच्या शीतल शाहू व रवीना सूर्यवंशीने "होमलेस वर्ल्डकप'चा अनुभव "शेअर' केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com