थंडी "रिटर्न्स' पारा 9.8 अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

नागपूर - "वरदा' वादळामुळे दोन-तीन दिवस ब्रेक घेणाऱ्या थंडीचे पुन्हा विदर्भात आगमन झाले. रविवारी नागपुरात पारा सरासरीपेक्षा तीन अंशांनी घसरून 9.8 अंशांवर स्थिरावला. तर, गोंदियात लागोपाठ तिसऱ्या दिवशी किमान तापमान विदर्भात नीचांकी राहिले.

उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे विदर्भात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा प्रकोप जाणवत आहे. नऊ डिसेंबरला पाऱ्यात 8.1 अंश सेल्सिअस इतकी विक्रमी घसरण झाली होती. त्यानंतर बंगालच्या उपसागरात अचानक उठलेल्या "वरदा'च्या प्रभावामुळे तापमानात वाढ होऊन पारा 13 अंशांपर्यंत चढला होता. मात्र, दोन दिवसांपासून उत्तरेकडील गारठायुक्‍त वारे पुन्हा विदर्भाच्या दिशेने वाहू लागल्याने हुडहुडी वाढत चालली आहे. रविवारच्या रात्री शहरात 9.8 अंश सेल्सिअस इतक्‍या तापमानाची नोंद करण्यात आली. तर, गोंदिया (9.7 अंश सेल्सिअस) येथे सर्वांत कमी तापमानाची नोंद करण्यात आली. अमरावती (11.0 अंश सेल्सिअस) आणि वर्धा (11.5 अंश सेल्सिअस) येथेही पाऱ्यात लक्षणीय घट दिसून आली. येत्या आठवड्यात थंडीचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

Web Title: winter Returns