सभेत लाल, तर परिषदेत हिरवा गालिचा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

नागपूर - सरकार कोणाचेही असो, राज्याच्या तिजोरीत कितीही खडखडाट असो. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचा श्रीमंती थाट काही जात नाही. हिवाळी अधिवेशनानिमित्त येणाऱ्या मायबाप सरकारला खुश ठेवणे, त्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी कितीही आरोप पचवण्याची त्यांची तयारी असते. यंदा विधानसभा आणि परिषदेच्या सभागृहातील गालिचा (मॅट) बदलवण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरविले आहे.

राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तिजोरीत खडखडाट आहे. दोन लाख कोटींच्यावर कर्ज असल्याचे खुद्द शासनाकडून सांगण्यात येते. आर्थिक परिस्थितीचेच कारण पुढे करून नवीन पदभरतीवर निर्बंध घालण्यात आले. अनावश्‍यक खर्च टाळण्याच्या सूचनाही शासनाने सर्व विभागांना दिल्या आहेत. मात्र, अधिवेशनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलीच तडजोड करायची नाही असे ठरविले आहे. याकरिता लाखो रुपये खर्च करून खराब झाली नसली तरी संपूर्ण मॅट बदलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षीच अधिवेशनासाठी रविभवन, नागभवन, आमदार निवास तसचे विधिमंडळाच्या इमारतीची रंगरंगोटी केली जाते. डागडुजी केली जाते. फर्निचर बदलले जाते. साधरणतः दोन आठवड्यांपेक्षा अधिककाळ अधिवेशनच चालत नाही. असे असतानाही येथील दर्जेदार फर्निचर, महागडे साहित्य खराब होते. इतके दर्जेदार साहित्य कुठून आयात केले जाते, हे फक्त सार्वजनिक बांधकाम विभागातीलच अधिकाऱ्यांना ठाऊक असते.

कुठून येणार गालिचा?
पाच वर्षांपूर्वी न्यायालयाच्या आदेशावरून याचा शोध घेण्यात आला होता. तेव्हा महागडे साहित्य चंद्रपूर शहरातील पानटपरी एवढ्या आकाराच्या दुकानातून खरेदी केल्याचे उघड झाले होते. संपूर्ण विदर्भाची मुख्य बाजारपेठ नागपूर असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने चंद्रपूरमधील खरेदीदार शोधून काढला होता. यंदा गालिचा कुठून आणला, हे अद्याप कळायचे आहे. विधानसभेत मऊशाल लाल रंगाचा तर विधान परिषदेच्या सभागृहात हिरव्या रंगाचा गालिचा टाकला जाणार आहे.

Web Title: winter session nagpur