esakal | महिला वनरक्षकासोबत असभ्य वर्तन झाल्याची तक्रार, अमरावती वनविभागाच्या संरक्षण कॅम्पमधील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

woman accused that misbehave with her in forest department camp in amravati

पीडित महिला वनरक्षकाने त्यांच्यासोबत झालेल्या असभ्य वर्तनासंदर्भातील तक्रार ११ जानेवारी २०२१ रोजी वडाळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे केली होती. 'घटनेच्या दिवशी एका व्यक्तीने कॅम्पमध्ये येऊन गैरकृत्य केले.

महिला वनरक्षकासोबत असभ्य वर्तन झाल्याची तक्रार, अमरावती वनविभागाच्या संरक्षण कॅम्पमधील घटना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत एका संरक्षण कॅम्प परिसरात कार्यरत महिला वनरक्षकासोबत जानेवारी २०२१ मध्ये एकाने असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला होता. त्या प्रकरणाची चौकशी उपवनसंरक्षक कार्यालयातील विशाखा समितीकडून सुरू आहे. 

हेही वाचा - नागपुरात डेकोरेशनच्या गोदामाला भीषण आग; साहित्य जाळून...

पीडित महिला वनरक्षकाने त्यांच्यासोबत झालेल्या असभ्य वर्तनासंदर्भातील तक्रार ११ जानेवारी २०२१ रोजी वडाळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे केली होती. 'घटनेच्या दिवशी एका व्यक्तीने कॅम्पमध्ये येऊन गैरकृत्य केले. महिला वनरक्षक एकट्या जंगलात तैनात असताना संबंधित व्यक्तीने त्यांना मारहाण करून अत्याचाराचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीने येथील चटई, कटर मशीनसह इतर शासकीय सामग्रीची तोडफोड केली', असा आरोप महिला वनरक्षकाने वडाळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. हा प्रकार बघून घाबरल्याने पीडितेने संरक्षण कॅम्पमधून थेट फ्रेजरपुरा ठाणे गाठून तक्रार दिली. दुसऱ्या दिवशी पुन्हा संरक्षण कॅम्पमध्ये गेले असता, येथील कटर मशीनसह इतर सामग्रीची तोडफोड झाल्याचे लक्षात आले. 

हेही वाचा - होळीच्या दिवशी रंग खेळण्याचा आनंद बेतला जिवावर; दोन...

दरम्यान, यासंदर्भात फ्रेजरपुरा पोलिसांशी संपर्क साधला असता, तशी तक्रार महिला वनरक्षकाने दाखल केली होती. ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाही ठाण्यात बोलाविले. त्यानंतर दोघांमध्ये आपसी समझोता झाला. त्यामुळे तक्रार नसल्याने गुन्हा नोंदविला नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात वडाळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही. 

संबंधित महिला वनरक्षकाच्या तक्रारीची चौकशी विशाखा समितीकडून सुरू आहे. या प्रकरणात दोघांचे बयाण व्हायचे आहे. ९० दिवसांच्या आत अहवाल सादर केला जाईल. 
- चंद्रशेखर बाला, उपवनसंरक्षक, अमरावती. 

loading image