Accident : समृद्धी महामार्गावर अपघात; महिलेचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर वनोजा इंटरचेंजपासून छत्रपती संभाजीनगरकडे, जवळपास सात किलोमीटर अंतरावर सोमवारी सकाळी १० वाजता दरम्यान भीषण अपघात झाला.
Accident
AccidentSakal
Summary

समृद्धी महामार्गावर वनोजा इंटरचेंजपासून छत्रपती संभाजीनगरकडे, जवळपास सात किलोमीटर अंतरावर सोमवारी सकाळी १० वाजता दरम्यान भीषण अपघात झाला.

मंगरूळपीर - समृद्धी महामार्गावर वनोजा इंटरचेंजपासून छत्रपती संभाजीनगरकडे, जवळपास सात किलोमीटर अंतरावर सोमवारी सकाळी १० वाजता दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात एक महिला ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

रस्त्याच्या कडेला असलेल्या डिवाईडर व पुलाच्या कठड्याला जी जे २७ के ८२७१ क्रमांकाच्या फॉर्च्युनर गाडीने धडक दिली. या गाडीमध्ये गुजरात येथील गोयल दाम्पत्य छत्रपती संभाजीनगरकडून नागपूरकडे जात होते. गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असल्याचा अंदाज प्रथमदर्शनी प्रवाशांनी सांगितले. या अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झालेली असून पुरुषाच्या डोक्यालाही इजा झालेली होती. यावेळी वनोजा येथील गोपाल राऊत हे समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असताना त्यांना अपघात झाल्याचे दिसले. याप्रसंगी त्यांनी १०८ वर फोन केला आणि सहकाऱ्यांच्या मदतीने गाडीतील जखमींना मदत केली. अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली.

जखमींना शेलुबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून, पुढील उपचाराकरिता अकोला येथे पाठवण्यात आले. या अपघातामध्ये महिला सीमा गोयल वय ४८ राहणार अहमदाबाद यांना मृत घोषित केले. सुरेंद्र गोयल हे गंभीर जखमी असून त्यांना अकोला येथे ॲडमिट करण्यात आले.

Accident
Cotton : कापसाचे ढीग पाहून शेतकऱ्यांचे वाढले टेन्शन

समृद्धी महामार्गावर मोटरसायकल घेऊन नागरिकांना ये-जा करता येत नसल्यामुळे अपघातग्रस्तांना मदत करण्यास बराच वेळ लागत आहे. बऱ्याच वेळा समृद्धी महामार्गावर चालणारे वाहनधारक अपघातग्रस्त गाडीजवळ थांबत नसल्यामुळे ही अपघातग्रस्तांना मदत मिळण्यास वेळ लागतो. गंभीर दुखापत झालेल्या अपघातग्रस्तांना तात्काळ उपचार व्हावा या दृष्टिकोनातून जवळच्या परिसरातील नागरिकांना समृद्धी महामार्गावर जाण्यास मुभा असल्यास जखमींना जीवनदान मिळू शकते. तसेच समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर ॲम्बुलन्स उभी असून सुद्धा त्यांना सर्व माहिती दिल्यावरही मदत मिळण्यास वेळ लागतो.

- गोपाल राऊत, सामाजिक कार्यकर्ते, वनोजा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com