esakal | खुशखबर! आता बिनधास्त करा गोड पदार्थ; किरकोळ बाजारात गूळ झाला स्वस्त  
sakal

बोलून बातमी शोधा

Jaggery became cheaper in retail market

नागपंचमीपासून गुळाच्या मागणीत वाढ सुरू होते. गौरी-गणपती, नवरात्रोत्सव, दिवाळीपर्यंत गुळाला मागणी असते. नवरात्रोत्सवात झालेल्या मुसळधार पावसामुळे ऊसतोडणी झाली नाही. त्यामुळे गुऱ्हाळे बंद ठेवण्यात आली होती.

खुशखबर! आता बिनधास्त करा गोड पदार्थ; किरकोळ बाजारात गूळ झाला स्वस्त  

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर ः गुळाची आवक वाढल्याने घाऊक बाजारात गुळाचे दर घसरले आहे. किरकोळ बाजारात गुळाचे दर किलोमागे १० रुपयांनी कमी झाले आहे. एक महिन्यापूर्वी गूळ ५० ते ६० रुपयांपर्यंत पोहोचला होता. तो आता ३८ ते ५० रुपये किलोवर आला आहे. 

नागपंचमीपासून गुळाच्या मागणीत वाढ सुरू होते. गौरी-गणपती, नवरात्रोत्सव, दिवाळीपर्यंत गुळाला मागणी असते. नवरात्रोत्सवात झालेल्या मुसळधार पावसामुळे ऊसतोडणी झाली नाही. त्यामुळे गुऱ्हाळे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे मागणीच्या तुलनेत आवक अपुरी पडत असल्याने महिन्यापूर्वी गुळाच्या दरात तेजी आली होती. 

अधिक वाचा - ही दोस्ती तुटायची नाय : दुर्धर आजाराने ग्रस्त मित्राच्या उपचारासाठी गोळा केला साडेपाच लाखांचा निधी

अनलॉकमध्ये गुऱ्हाळे सुरू झाली असून उसाची आवकही वाढलेली आहे. त्यामुळे गुळाच्या दरात गेल्या महिन्यापासून घसरण सुरू झालेली आहे, अशी माहिती किराणा व्यापारी प्रकाश जैस यांनी दिली. नागपूर शहरात कानपूर, मेरठ,कोल्हापूर, पुणे, बारामती, कऱ्हाड, सांगली या भागातील गुऱ्हाळ्यातून गुळाची आवक होते. 

राज्यातील बारामती; कराड, पाटण, सांगली भागात गुऱ्हाळे सुरू झालेले आहेत. मागणी अधिक असल्याने गुऱ्हाळे दिवस-रात्र सुरू होते. आता उत्पादन वाढले असून अनलॉकमध्ये मालाची आवकही वाढलेली आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरात गुळाच्या दरात घसरण झालेली आहे. 

दिवाळीच्या तोंडावर गुळाचे दर कमी झाल्याने गृहिणीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. अनारसे, करंज्या; तसेच सारणपुडीसाठी गुळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. दिवाळीनंतर गुळाची मागणी कमी होईल. त्यानंतर दरात घट होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा - सतर्कतेचा इशारा; पावसाची शक्यता, अधिकाऱ्यांना मुख्यालयी रहाण्याचे निर्दे

सेंद्रिय गुळाला मागणी 

गेल्या काही वर्षांपासून राज्यात सेंद्रिय गुळाच्या मागणीत सतत वाढ होत आहे. सेंद्रिय गूळ रसायन विरहित आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशात गुळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. महाराष्ट्रातील कोल्हापूर भागातील गुळाची प्रतवारी उत्तम मानली जात असल्याने या गुळाला विशेष मागणी असते.

संपादन - अथर्व महांकाळ