चिखलदऱ्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

चिखलदरा (जि. अमरावती) : जिल्ह्यात सायंकाळी अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. चिखलदरा तालुक्‍यातील जामून नाला गावात गुरुवारी (ता. 25) सायंकाळी वीज कोसळून कुसुम कानू कास्देकर या महिलेचा मृत्यू झाला.
कुसुम कास्देकर (वय 40) या शेताच्या धुऱ्यावर बैल चारत असताना अचानक अंगावर वीज कोसळली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या जामली (एक) गटग्रामपंचायतच्या उपसरपंच होत्या. चिखलदराचे तहसीलदार मनीष गायकवाड यांनी मृत महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शासनाकडून मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman dies after lightning strikes