तहसील कार्यालयात असे काय घडले!

malkapur
malkapur

मलकापूर (जि.बुलडाणा)  ः बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तहसील कार्यालयात आज विचित्र घटना समोर आली. कार्यालयातील वरीष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या महिलेने चक्क कार्यालयातच विष घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. 

तहसिल कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागात अलका नंदू चव्हाण कार्यरत आहेत. दुपारी दोन ते तीन वाजताच्या सुमारास अलकाने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांना तात्काळ डॉ.अशोक काबरा यांच्या रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. येथून पुढे त्यांना उपचार करून त्यांना डॉ. विशाल झंवर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरून नैसर्गिक आपत्ती विभागात कर्मचाऱ्यांचे मतभेद असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते. मात्र असे असले तरी मतभेदांमुळे टोकाचे पाऊल कोणत्याही कर्मचाऱ्यास घ्यावे लागत असेल तर वरीष्ठ अधिकाऱ्यांनी वेळी लक्ष घालणे गरजेचे असते.   

अधिकाऱ्यांची धावाधाव
ही घटना कळताच  उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर, तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, नायब तहसीलदार गजानन राजगडे, नायब तहसीलदार प्रविण घोटकर आदींनी रुग्णालयाकडे धाव घेत त्या महिलेच्या तब्येतीची चौकशी करून परिस्थिती जाणून घेतली. महिला कर्मचाऱ्यास पुढील उपचारार्थ जळगाव खान्देशकडे रुग्णवाहिकेद्वारे रवाना करण्यात आले.  

अपमानास्पद वागणूकीचा पतीचा आरोप
त्या महिला कर्मचारी हीचे पती अनिल भोसले यांनी माझ्या पत्नीने वरीष्ठ अधिकारी यांच्या अपमानास्पद वागणूकीला व सततच्या त्रासाला कंटाळून माझी पत्नी अलका चव्हाण हीने कार्यालयात विषारी औषध प्राशन केले, असा आरोप पत्रकारांशी बोलताना केला.

कुणाबद्दल आकस न ठेवता काम 
कार्यालयीन शिस्तीमध्ये कर्मचाऱ्यांकडून काम करुन घेणे हे माझे कर्तव्य आहे. त्या कर्तव्याचा भाग म्हणून कुणाला दुखावणे, पान उतारा करणे, कुणाबद्दल ही आकस बुद्धी न ठेवता आम्ही काम करीत असतो.
- गजानन राजगडे, निवासी नायब तहसीलदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com