वाघाच्या हल्यात महिला गंभीर जखमी | tiger | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाघ

वाघाच्या हल्यात महिला गंभीर जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पोंभूर्णा : भावाकडे भाऊबीजसाठी बोर्डा बोरकर येथे आलेल्या चेकहत्तीबोडी येथील भावाच्या शेतात धान कापणीचे काम पाहण्यासाठी गेलेल्या महिलेवर शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना १५ नोव्हेंबर दुपारी १२:३० च्या सुमारास घडली. कांताबाई रामदास चलाख वय ६० वर्षे असे जखमी महिलेचे नाव असून ती मूल तालुक्यातील सिंथळा येथील रहिवासी आहे.

हेही वाचा: भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे झाले काँग्रेसवासी

पोंभूर्णा वनपरीक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या चेकहत्तीबोळी शेतशिवारात बोर्डा बोरकर येथील देवेंद्र कुनघाडकर यांचे शेत असून शेतात धानकापणीचे काम सुरू होते. भाऊबीजेसाठी आलेली बहिण आपल्या भावाच्या शेतात धान कापणीचे काम पाहणीसाठी गेली असता शेतातील पारीवर दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने सदर महिलेवर हल्ला चढवून गंभीर जखमी केले. मात्र महिलेनी आरडाओरड केल्याने शेतात काम करीत असलेल्या मजूराने वाघाच्या दिशेने धाव घेतले असता वाघ जंगलाच्या दिशेने निघून गेला या हल्यात सदर महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभूर्णा येथे दाखल करून उपचार करण्यात आले.

loading image
go to top