प्रियकराने केला शिक्षिकेवर बलात्कार

Rape
Rape

नागपूर - एका शिक्षिकेसोबत जवळपास आठ वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या एका युवकाने लग्नास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या प्रेयसीने प्रियकराविरुद्ध बलात्कार  केल्याची तक्रार दिली. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पीडित ४१ वर्षीय महिला कविता (बदललेले नाव) ही नंदनवनमध्ये राहते. ती एका नामांकित शाळेत शिक्षिका आहे. आरोपी सौरभ सिंह (रा. मध्य प्रदेश) याच्याशी २०११ ला मित्राच्या माध्यमातून कविताशी ओळख झाली. दोघांची फोनवरून मैत्री वाढली. दोघांचे प्रेमसंबंध  प्रस्थापित झाले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे आरोपी मध्य प्रदेश सोडून कवितासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायला लागला. यादरम्यान त्याने लग्न करण्याचे आमिष दाखवून कविताचे सलग आठ वर्षे लैंगिक शोषण केले. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी तो कविताला सोडून मध्य प्रदेशला निघून गेला. हिने वारंवार फोन करून परत येण्याचा तगादा लावला असता त्याने परत येण्यास नकार दिला. त्यामुळे कविताने नंदनवन पोलिसांत बलात्कार करून पळून गेल्याची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com