बसच्या धडकेत महिला बचावली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

नागपूर : वेळ आली होती; पण काळ आला नसल्याने बुधवारी प्रतापनगर चौकात सिग्नलवर उभ्या असलेल्या अनेक दुचाकीस्वारांचे प्राण वाचले. एका महिलेची स्कूटी बसच्या चाकाखाली आली होती. मात्र, त्या सुदैवाने बचावल्या. ही थरारक घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. बसचालकाच्या प्रसंगावधानाने भीषण अपघात टळला.

रिंगरोडवरून जयताळा येथून प्रतापनगरच्या दिशेने महापालिकेची आपली बस जात होती. प्रतापनगर चौकातील सिग्नलवर लाल दिवा लागला असल्याने अनेक दुचाकीस्वार उभे होते. चौकाच्या जवळ येताच बसचा वेग कमी करण्यासाठी चालकाने ब्रेक दाबले. यावेळी चौकाचे अंतर अगदी तीन ते चार फूट होते. ब्रेक नादुरुस्त असल्याचे चालकाच्या लक्षात येताच बस फुटपाथवर घातली. यात जयश्री मेश्रामच्या स्कूटीला बसची धडक बसली. त्या व त्यांची स्कूटी बसच्या पुढच्या चाकाखाली आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. हे दृष्य बघून अनेकांना धक्का बसला. उपस्थितांनी घटनास्थळी धाव घेतली. बस मागे घेऊन महिलेला बाहेर काढण्यात आले. यात जयश्री या थोड्याफार जखमी झाल्या होत्या. त्यांना तत्काळ
उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी बसमध्ये सुमारे 30 प्रवासी बसले होते. बसचालक
नितीन सेलोकर यांनी प्रसंगावधान राखले नसते, तर अनेकांना जीव गमवावा लागला असता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The woman was rescued at the bus stop