कौशल्य विकासातून मुलींना आत्मनिर्भर करणार, काय सांगतात महिला व बालविकास मंत्री

नीलेश डोये
Thursday, 1 October 2020

यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी शासकीय मुलींचे वसतिगृह, प्रियदर्शनी महिला वसतिगृह तसेच करुणा होमला भेट देऊन येथील मुली व महिलांसोबत संवाद साधला. संरक्षण विभागात येणाऱ्या अडचणी तसेच त्यांच्या शिक्षण तसेच कौशल्य विकासासंदर्भात प्रथमच मंत्र्यांसोबत मनमोकळी चर्चा केली. 

नागपूर  : महिला व बाल विकास संरक्षण गृहातील महिला, मुली तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत दाखल झालेल्या महिला व मुलींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. त्यांना संरक्षण मिळावे यासाठी न्यायालय, पोलिस तसेच महिला व बाल विकास विभाग यापुढे समन्वयाने काम करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी शासकीय मुलींचे वसतिगृह, प्रियदर्शनी महिला वसतिगृह तसेच करुणा होमला भेट देऊन येथील मुली व महिलांसोबत संवाद साधला. संरक्षण विभागात येणाऱ्या अडचणी तसेच त्यांच्या शिक्षण तसेच कौशल्य विकासासंदर्भात प्रथमच मंत्र्यांसोबत मनमोकळी चर्चा केली. 

सविस्तर वाचा - अचानक का कमी झाली कोरोना बाधितांची संख्या? अतिशय धक्कादायक कारण आले समोर
 

महिला व मुलींच्या संरक्षणासोबतच त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक निर्णय घेऊन आत्मनिर्भर करण्याबाबत आश्वस्त केले. यावेळी शासकीय मुलींच्या बालगृहाच्या अधीक्षिका अंजली निंबाळकर, शासकीय करुणा महिला वसतिगृहाच्या अधीक्षिका शीला मांडवेकर, शासकीय मुलांच्या निरीक्षण गृहाच्या अधीक्षिका नम्रता चौधरी, अनिरुद्ध पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा गहरवार, परिविक्षा अधिकारी मनीषा आंबेडा़रे, डी. टी. कळंबे, समुपदेशक कविता इखार, लता कांबळे, व्ही.व्ही. दुधकवर, जिल्हा परिविक्षा अधिकारी चंद्रकांत बोंडे, प्रशांत व्यवहारे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, बाल विकास संरक्षण अधिकारी सचिन जाधव आदी  उपस्थित होते. 

येथील स्वच्छता, पिण्याचे पाणी व जेवण्याची व्यवस्था समाधानकारक असल्याचे ठाकूर यावेळी म्हणाल्या. शासकीय महिला भिक्षेकरी स्वीकार केंद्र तसेच केंद्र शासन पुरस्कृत ‘सखी’ वन स्टॉप सेंटरला देखील यावेळी त्यांनी भेट दिली. 

संपादन  : अतुल मांगे  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women and Child Development Minister Yashomati Thakur  talking with  girls in the Child Development Home