नागपूरात दोन महिला पोलिसांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

एका व्यक्‍तीच्या घरात तोडफोड करून धिंगाणा घालणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या दोन महिला शिपायांना अश्‍लील शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आरोपी महिलेविरूद्ध कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नागपूर- एका व्यक्‍तीच्या घरात तोडफोड करून धिंगाणा घालणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या दोन महिला शिपायांना अश्‍लील शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आरोपी महिलेविरूद्ध कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रियंका अमित उदासी (38) असे आरोपी महिलेचे नाव असून तिला अटक केली. 

प्रियंकाचे नंदनवन हद्दीत फार्मसीचे दुकान आहे. तिचे महाल येथील पक्वासा दवाखान्याजवळ राहणाऱ्या स्वप्निल ठाकरे याच्याशी ओळख होती. परंतु, मागील काही दिवसांपासून स्वप्निल हा तिला टाळत होता. त्यामुळे ती संतप्त झाली होती. सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास प्रियंका ही स्वप्निलच्या घरी गेली. तिने त्याच्या घरातील सामानाची तोडफोड करून धिंगाणा घालायला सुरुवात केली. स्वप्निलने ही माहिती शहर नियंत्रण कक्षाला दिली. माहिती मिळताच कोतवालीच्या महिला शिपाई सरीता पाटील या घटनास्थळी गेल्या. सरीताने प्रियंकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता प्रियकांने सरीताला शिवीगाळ करीत हातबुक्कीने मारहाण केली. त्याचप्रमाणे सरीताच्या डाव्या मनगटावर चावा घेऊन उजव्या हाताच्या नखाने ओरबडून जखमी केले. 

पोलिसांनी जबरीने तिला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्यात सुद्धा महिनेले धुमाकूळ घालून इतर महिला शिपायांना शिवीगाळ करीत मारहाण केली. त्याचप्रमाणे त्यांनाही नखाने ओरबडून जखमी केले. याप्रकरणी सरीताच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदवून प्रियंकाला अटक केली.

Web Title: women arrested for beating lady police in nagpur