अनैतिक संबंधाच्या संशयावरून महिलेला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

नागपूर : पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीने घरी भांडी-धुणी करणाऱ्या महिलेच्या घरात घुसून तिला बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर तिचे कपडे फाडून तिच्या अब्रूचे धिंडवडे काढले. रस्त्यावर लोळवून सर्वांसक्षम चपलेने चोपले व शिवीगाळ केली. एवढ्यावरच ती थांबली नाही, तर मोबाईलने व्हिडिओ तयार करून तो "व्हायरल' केला.

बुधवारी जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या इंदोरा बाराखोली परिसरात ही घटना घडली. लता वंजारी (वय 35) पीडित महिलेचे नाव आहे. ती जरीपटका येथील मंदा डंबारेकडे घरकाम करायची. मंदाला तिचे आपल्या पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याचा जाब आपल्या पतीला विचारण्याऐवजी तिने मोलकरणीलाच दोषी धरले. तिच्यावर चोरीचा आळ लावला. यानंतरही तिचे समाधान झाले नाही. ती मुलगा सोनूला घेऊन तिच्या घरी धडकली. तिला घराबाहेर खेचून अमानुष मारहाण केली. मारहाण सुरू असताना या घटनेचे सोनूने व्हिडिओ रेकॉर्डिंग केले.
पीडित महिलेने जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार केली. मात्र, पोलिसांनी याची साधी दखलही घेतली नाही. दुसरीकडे, पोलिस ठाण्यात गेल्यास पीडित महिलेला सोडणार नाही, अशी धमकी दिली. कोणीच दखल घेत नसल्याने पीडित लता वंजारीने आज पत्रकार भवन गाठले. पत्रकारांना आपबिती सांगितली. पोलिस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचेही तिने सांगितले.

Web Title: Women assault on suspicion of immoral relations