वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 एप्रिल 2017

सिंदेवाही (जि. चंद्रपूर) - जंगलात मोहफुले वेचत असतानाच वाघाने केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास सावरगटा जंगलात घडली. मृत महिलेचे नाव मीना प्रल्हाद कोलते (वय 28) आहे.

सध्या मोहफुलांचा हंगाम सुरू आहे. जंगलाशेजारी राहणाऱ्या गावातील पुरुष, महिला मोहफुल संकलनासाठी जातात. सावरगटा येथील मीना कोलते आणि काही महिला सकाळीच जंगलात गेल्या होत्या. मोहफुल वेचण्याच्या नादात मीना कोलते दूरवर जंगलात चालल्या गेल्या.

त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. बराचवेळ लोटूनही त्या परत आल्या नाही, त्यामुळे गावकरी जंगलात गेले. तेव्हा त्यांना मीनाचा मृतदेह आढळून आला. यापूर्वी सिंदेवाही तालुक्‍यातील मोहाळी आणि चकबामणी येथील महिलांना वाघाने ठार केले होते.

Web Title: women death by tiger attack