तणसाच्या ढिगात जाळून शेतकरी महिलेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

गडचिरोली : विधवा शेतकरी महिलेने आपल्या शेतातील तणसाच्या ढिगात स्वत:ला जाळून घेतल्याची घटना देसाईगंज तालुक्‍यातील पोटगाव येथे गुरुवारी (ता. 6) सायंकाळी घडली. मुक्ताबाई मुकुंदा धोटे (वय 75), असे मृत महिलेचे नाव आहे.

देसाईगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताबाई ही नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या शेतावर गेली. दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी तिने तणसाच्या ढिगात शिरून आग लावली. यात तिचा होरपळून मृत्यू झाला. तिच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मुलाचा कुणावरही संशय नाही. तणावाखाली तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तिच्यावर काही कर्ज होते का, याबाबतची माहितीही मिळाली नाही. मात्र, मुक्ताबाईने घरगुती वादातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

Web Title: women farmer commited suicide