कर्जबाजारी महिला शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : तीन वर्षांपासून सतत नापिकी व बॅंकेच्या कर्जामुळे निराश झालेल्या शेतकरी महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता.17) मध्यरात्री विरूळ रोंघे येथे घडली. शेवंताबाई चंपत राऊत (वय 60) असे आत्महत्या केलेल्या महिला शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे वडगाव राजदी परिसरात साडेतीन एकर शेती आहे. या शेतीत पेरणी करून त्या उत्पन्न घेत असत. मात्र, उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होता. दोन वर्षे बॅंकेचे कर्ज घेतले, परंतु दोन लाख कर्जाची परतफेड करता आली नाही. अखेर शनिवारी रात्री त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : तीन वर्षांपासून सतत नापिकी व बॅंकेच्या कर्जामुळे निराश झालेल्या शेतकरी महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता.17) मध्यरात्री विरूळ रोंघे येथे घडली. शेवंताबाई चंपत राऊत (वय 60) असे आत्महत्या केलेल्या महिला शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे वडगाव राजदी परिसरात साडेतीन एकर शेती आहे. या शेतीत पेरणी करून त्या उत्पन्न घेत असत. मात्र, उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होता. दोन वर्षे बॅंकेचे कर्ज घेतले, परंतु दोन लाख कर्जाची परतफेड करता आली नाही. अखेर शनिवारी रात्री त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्‍चात मुलगा, तीन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women farmer commits suicide