जहाल महिला नक्षलवादी पार्वती पोलिसांच्या ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 December 2019

नक्षलवादी पार्वती सडमेक 2006 मध्ये नक्षल चळवळीत दाखल झाली होती. 2006 ते 2008 या कालावधीत जहाल नक्षलवादी नर्मदा हिची अंगरक्षक म्हणून ती काम पाहत होती. 2010 ते 2012 पर्यंत ती गट्टा (जा.) दलमची कमांडर रामकोसोबत महिला संघटनेचे काम पाहत होती. 2012 ते 14 मध्ये ती भामरागड दलमच्या उपकमांडर पदावर कार्यरत होती. त्यानंतर 2014 पासून एरिया कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होती.

गडचिरोली : जहाल महिला नक्षलवादी व सध्या भामरागड एरिया कमिटीच्या सदस्य पदावर कार्यरत पार्वती ऊर्फ सुशीला शंकर सडमेक (वय 24, रा. मडवेली, पोलिस स्टेशन ताडगाव, ता. भामरागड) हिला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. 

नक्षलवादी पार्वती सडमेक 2006 मध्ये नक्षल चळवळीत दाखल झाली होती. 2006 ते 2008 या कालावधीत जहाल नक्षलवादी नर्मदा हिची अंगरक्षक म्हणून ती काम पाहत होती. 2010 ते 2012 पर्यंत ती गट्टा (जा.) दलमची कमांडर रामकोसोबत महिला संघटनेचे काम पाहत होती. 2012 ते 14 मध्ये ती भामरागड दलमच्या उपकमांडर पदावर कार्यरत होती. त्यानंतर 2014 पासून एरिया कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होती.

क्लिक करा - नवऱ्याऐवजी प्रियकरावर केले प्रेम अन्‌ झाला घात

गडचिरोली पोलिस दलाने तिला 6 मे 2019 रोजी डुंगा कोमटी मडावी (रा. नैनवाडी, ता. भामरागड) याचा खून केल्याच्या गुन्ह्यात शुक्रवारी (ता. 6) अटक केली. 

सहा लाख रुपयांचे होते बक्षीस
न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शासनाने तिच्यावर सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत तिच्यावर 24 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या व्यतिरिक्त आणखी किती गुन्ह्यात तिचा सहभाग आहे, याचा तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women maoist arrested gadchiroli

Tags
टॉपिकस
Topic Tags: