महिलांना कधी मिळेल सुरक्षेचा ‘भरोसा’?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

नागपूर - महिला आणि युवतींच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा ‘भरोसा’ पोलिस विभागाने दर्शविला होता. मात्र, दिवसेंदिवस छेडखानी, शेरेबाजी, रोडरोमियोंचा त्रास वाढत चालला आहे. परीक्षार्थी विद्यार्थिनींसह महिलांना त्रास देण्याच्या घटना उघडकीस येत आहेत. बुधवारी दोन विद्यार्थिनींसह पाच महिलांचा विनयभंग केल्याच्या घटना उघडकीस आल्या. त्यामुळे उपराजधानीतील महिला खरंच सुरक्षित आहेत का? याबाबत संशय निर्माण झाला आहे. 

नागपूर - महिला आणि युवतींच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा ‘भरोसा’ पोलिस विभागाने दर्शविला होता. मात्र, दिवसेंदिवस छेडखानी, शेरेबाजी, रोडरोमियोंचा त्रास वाढत चालला आहे. परीक्षार्थी विद्यार्थिनींसह महिलांना त्रास देण्याच्या घटना उघडकीस येत आहेत. बुधवारी दोन विद्यार्थिनींसह पाच महिलांचा विनयभंग केल्याच्या घटना उघडकीस आल्या. त्यामुळे उपराजधानीतील महिला खरंच सुरक्षित आहेत का? याबाबत संशय निर्माण झाला आहे. 

पहिल्या घटनेत, ३५ वर्षीय पीडित महिला यशोधरानगरात राहते. त्या महिलेची शेजारी राहणारा आरोपी प्रकाश बावनगडे (५०) याच्याशी ओळखी झाली. मात्र, त्याने ओळखीतून एकतर्फी प्रेम विवाहितेवर केले. बावनगडे हा मागील काही दिवसांपासून महिलेचा सतत पाठलाग करून त्रास देत होता. विवाहितेच्या पतीला जिवे मारण्याची धमकी देऊन तो तिच्याशी अश्‍लील चाळे करायचा. आरोपीचा त्रास असह्य झाल्याने विवाहितेने कुटुंबीयांना माहिती दिली. यानंतर कुटुंबीयांसह यशोधरानगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

दुसऱ्या घटनेत, सक्‍करदऱ्यात राहणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीचा आरोपी अभिषेक दिवेकर हा युवक गेल्या काही महिन्यांपासून ट्यूशनपर्यंत पाठलाग करीत होता. त्याने ओळखी वाढवून विद्यार्थिनीला जाळ्यात ओढले. तिच्याशी खासगीत फोटो काढून व्हॉट्‌सॲपवर टाकले. तिने भेटण्यास नकार दिला असता १९ जानेवारीपासून तिला फोनवरून फोटो फेसबुकवर टाकण्याच्या धमक्‍या देत होता. 

युवतीला रस्त्यावरच मारहाण
तिसऱ्या घटनेत, ओंकारनगरात राहणारा आशीष अशोक डबाले हा सिव्हिल लाइन्समधील शासकीय मुद्रणालयात नोकरीवर आहे. त्याचे सक्‍करदऱ्यात राहणाऱ्या २१ वर्षीय युवतीशी प्रेमसंबंध होते. ती युवती मंगळवारी सायंकाळी भांडेप्लॉट चौकातील एका हॉटेलमध्ये अन्य युवकासोबत त्याला दिसली. त्यामुळे चिडलेल्या आशीषने युवतीला रस्त्यावरच मारहाण केली. आशीषचा अवतार बघून तिच्या मित्राने लगेच धूम ठोकली. 

रस्त्यात अडवून छेडखानी
चौथ्या घटनेत, कळमन्यात राहणारी १६ वर्षीय मुलगी ही दहावीत शिकते. गेल्या चार महिन्यांपासून ती सायकलने ट्यूशनला जात होती. तिचा पाठलाग आरोपी वस्तीत राहणारा रमाशंकर गजपल्ला (वय २२) हा करीत होता. विद्यार्थिनीशी तो रस्त्यात अडवून छेडखानी करीत होता. या प्रकरणी कळमना पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

आत्महत्येची धमकी
पाचव्या घटनेत, हुडकेश्‍वरमध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय युवतीचा पाठलाग अमित उर्फ जस शंभरकर (वय ३०, रा. हुडको कॉलनी, जरीपटका) हा करीत होता. नोव्हेंबर २०१६ पासून तिला लग्नाची मागणी घालत होता. मात्र, ती नकार देत असल्यामुळे रोज तिचा पाठलाग करून त्रास देत होता. मंगळवारी सायंकाळी युवती घरातून बाहेर पडल्यानंतर अमितने तिच्याशी अश्‍लील चाळे केले आणि लग्न न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली. 

Web Title: Women Security issue