खासदार धानोरकर म्हणतात, नोकरी म्हणून नाही नैतिक जबाबदारी म्हणून काम करा

Work as a moral responsibility, not as a job : MP Balu Dhanorkar
Work as a moral responsibility, not as a job : MP Balu Dhanorkar

वणी (जि. यवतमाळ) : शेतकरी आधीच अडचणीत आहे. त्यामुळे त्यांना त्रास देऊन नका. कृषिपंपांना तत्काळ वीज पुरवठा करा ग्राहकांच्या वीज बिलासंदर्भात येणाऱ्या तक्रारींचे निवारण केवळ नोकरी म्हणून नाही तर आपली नैतिक जबाबदारी म्हणून कामे करा, असे निर्देश खासदार बाळू धानोरकर यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.

ताळेबंदीमध्ये नागरिकांना विजेचे बिल देण्यात आले नव्हते. तीन महिन्यांचे बिल एकाच वेळी आल्याने नागरिकांचे महिन्याचे बजेट कोलमडले. त्यातच विद्युत देयके जादा आल्याची ओरड सर्वत्र सुरू झाली. गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला वीज जोडणी करण्यात आली नसल्याने खासदार धानोरकर यांनी आठ जुलै रोजी येथील विश्रामगृहात उपविभागातिल वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी कार्यकारी अभियंता मंगेश वैद्य, उपकार्यकारी अभियंता विनोद मानकर, विलास चेले, रवींद्र खोंडे, राहुल पावडे, सहाय्यक अभियंता एम. ए. शेख उपस्थित होते. यावेळी खासदार यांनी वीज वितरण कंपनीच्या अनेक मुद्यांवर चर्चा केली.

कृषी वीज जोडणीबाबत विचारणा केली असता गेल्या दोन वर्षांपासून नवीन वीज जोडणी करण्यात आली नसल्याचे वास्तव समोर आले. शेतकऱ्यांना सोलर वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मात्र, सोलरपासून निर्मित होणाऱ्या विजेने कृषी पंप चालत नाही. शेतकऱ्यांची फसगत होत आहे. पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोलर बसविण्यास भाग पाडू नये त्यांना वीज जोडणी करून द्या. तसेच ज्या शेतकऱ्यांनी सोलरसाठी अनामत भरली असेल ती त्यांना परत करण्याचे निर्देश दिले तसेच शेतकऱ्यांरी केलेल्या तक्रारींचे 48 तासात निराकरण करणे गरजेचे असताना त्यांना बरेच दिवस वाट पहावी लागते, याकडे लक्ष वेधून तत्काळ त्यांच्या तक्रारी निकाली काढा, अशी सूचना केली.

उपविभागात 5600 ट्रान्सफार्मर बसवण्यात आले. मात्र, यातील एखाद्या ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाल्यास दुसरे ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी ट्रान्सफार्मर वीज वितरण कंपनीकडे उपलब्ध नसल्याचे यावेळी उघड झाले. खासदार धानोरकर यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची योग्य उत्तरे वीज वितरण कंपनीचे अधिकारी देऊ शकले नाही. त्यामुळे खासदार धानोरकर यांनी नाराजी व्यक्त केली. असमाधानकारक उत्तरे मिळाल्याने दिलेल्या निर्देशाचे पालन करून लवकरच पुन्हा आढावा घेतला जाणार असल्याचे सांगून नोकरी म्हणून नाही तर आपली नैतिक जबाबदारी म्हणून काम करा, असे ठणकावून सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com