खासगी बसच्या धडकेत कामगार ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

भद्रावती (जि. चंद्रपूर): वणीवरून आपले काम आटोपून भद्रावतीकडे परत येत असलेल्या गोपानी कंपनीतील कामगाराच्या दुचाकीला नागपूरकडे जाणाऱ्या बागडी ट्रॅव्हल्सच्या खासगी बसने जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. 20) दुपारी भद्रावतीनजीक असलेल्या कोंढा फाट्यावर घडली. प्रमोद पंडिले (वय 37) असे मृत कामगाराचे नाव आहे. जोपर्यंत मृताच्या नातलगांना नुकसानभरपाई मिळत नाही. तोपर्यंत शवविच्छेदन करण्यात आलेला मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृताच्या नातेवाइकांनी घेतल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता.

भद्रावती (जि. चंद्रपूर): वणीवरून आपले काम आटोपून भद्रावतीकडे परत येत असलेल्या गोपानी कंपनीतील कामगाराच्या दुचाकीला नागपूरकडे जाणाऱ्या बागडी ट्रॅव्हल्सच्या खासगी बसने जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. 20) दुपारी भद्रावतीनजीक असलेल्या कोंढा फाट्यावर घडली. प्रमोद पंडिले (वय 37) असे मृत कामगाराचे नाव आहे. जोपर्यंत मृताच्या नातलगांना नुकसानभरपाई मिळत नाही. तोपर्यंत शवविच्छेदन करण्यात आलेला मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृताच्या नातेवाइकांनी घेतल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. प्रमोद पंडिले हे भद्रावती शहरातील विंजासन येथील रहिवासी होते. ताडाळी येथील गोपानी कंपनीत ते कार्यरत होते. एका कामाच्या निमित्ताने दुचाकीने (क्र. एमएच 34 एएस 7695) वणी येथे गेले होते. आपले काम आटोपून हे कोंढा मार्गे भद्रावतीकडे परत येत असताना कोंढा फाट्याजवळ चंद्रपूरवरून नागपूरकडे जात असलेल्या खासगी बसने (क्र. एमएच 49 एटी 3985)जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी प्रहार जनशक्‍तीचे शंकर रासेकर, भाजपचे विजय वानखेडे व प्रवीण ठेंगणे यांनी केली आहे. खासगी बसचालक मुकेश क्रिष्णा साखरे याला पोलिसांनी अटक केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worker killed in private bus accident