कामगारांचे रक्त अधिकाऱ्यांना भेट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

यवतमाळ : येथील नगरपालिका प्रशासनातील अधिकारी कामगारांच्या आंदोलनाकडे लक्ष देत नसल्याने गुरुवारी (ता.22) अस्थायी कामागारांनी आपले रक्त प्रशासनाला भेट दिले.

यवतमाळ : येथील नगरपालिका प्रशासनातील अधिकारी कामगारांच्या आंदोलनाकडे लक्ष देत नसल्याने गुरुवारी (ता.22) अस्थायी कामागारांनी आपले रक्त प्रशासनाला भेट दिले.
किमान वेतनाच्या मागणीसाठी गेल्या दहा जुलैपासून अस्थायी कामगारांचे येथील नगरपालिकेसमोर आंदोलन सुरू आहे. तब्बल 42 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनावर अजूनही तोडगा निघालेला नाही. करारनाम्याप्रमाणे कामगारांना 14 हजार रुपये वेतन देण्याची मागणी कामगारांची आहे. या मागणीसाठी कामगारांचा लढा सुरू आहे. प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने अस्थायी कामागार लढाईच्या तयारीत आहेत. दरम्यान, आज गुरुवारी कामगारांनी आपल्या रक्ताची भेट नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. यावेळी विनोद शेंडे, दीपक भेंडे, शेख हसन, संदीप पाटील, दादाराव पजारे, धनंजय गौरखेडे, सुरेश भेंडे, भीमराव खडसे, प्रफुल्ल मेश्राम, महादेव तुपे आदी उपस्थित होते.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workers' Blood Visit to Officers