esakal | "सोने मी व्यापाऱ्यांना देऊन फसलो" असे सांगत सराफाला घातला तब्बल 90 लाखांचा गंडा  
sakal

बोलून बातमी शोधा

Workers did fraud of 90 lakhs to jeweler

प्रकाश दवाखान्यातून घरी आल्यावर चोरडिया यांनी त्याच्याकडे सोन्याची मागणी केली असता, ते सोने मी माझ्या जवळच्या सराफा व्यापाऱ्यांना देऊन फसलो असल्याचे सांगून 15 दिवसांच्या आत मी तुम्हाला तुमचे सोने परत करतो,

"सोने मी व्यापाऱ्यांना देऊन फसलो" असे सांगत सराफाला घातला तब्बल 90 लाखांचा गंडा  

sakal_logo
By
तुषार अतकारे

वणी (जि. यवतमाळ) : गलाई करण्याकरिता कारागिराला दिलेले दोन किलो सोने कारागिराने परत न करता येथील सराफा व्यावसायिकाची 90 लाख रुपयांत फसवणूक केली आहे. याबाबतची फिर्यादी संबंधित सराफा व्यावसायिकाने वणी येथील पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून गलाई कारागिरासह दोन सराफा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना वणी पोलिसांनी अटक केली आहे.

सविस्तर वाचा - युवतीला भलताच प्रश्‍न विचारणाऱ्या युवकाला पोलिसांनी केली अटक; मनधरणी करण्याचा आटापिटा
 
येथील मुख्य बाजारपेठेत विजयकुमार चोरडिया यांचे सोने-चांदी विकण्याचे दुकान आहे. चोरडिया यांनी येथील काळे ले-आउटमध्ये राहणारा सोने गलाई कारागीर प्रकाश भीमरावजी पवार याला गेल्या 24 ऑगस्ट 2020 रोजी 90 लाख रुपये किमतीचे 1,720.450 मी ग्राम सोने गलाई करण्याकरिता दिले होते. मात्र, प्रकाशची प्रकृती ठीक नसल्याने तो दवाखान्यात उपचार घेत असल्याने सोने परत घेण्यास उशीर झाला. 

प्रकाश दवाखान्यातून घरी आल्यावर चोरडिया यांनी त्याच्याकडे सोन्याची मागणी केली असता, ते सोने मी माझ्या जवळच्या सराफा व्यापाऱ्यांना देऊन फसलो असल्याचे सांगून 15 दिवसांच्या आत मी तुम्हाला तुमचे सोने परत करतो, असे 100 रुपयांच्या स्टॅंप पेपरवर लिहून दिले होते. मात्र, विहित मुदत संपूनही प्रकाशने सोने परत केले नसल्याने आपली फसगत होत असल्याचे विजयकुमार चोरडिया यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी प्रकाशच्या विरोधात वणी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता, सदर सोने हे महालक्ष्मी ज्वेलर्सचे जनार्दन गवळी व आदिक गवळी यांना दिल्याची कबुली आरोपी दिल्याने पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या तीनही संशयित आरोपींना येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, वणीचे ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव याबाबतचा पुढील तपास करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ