खासगीकरणाविरोधात अंबाझरी आयुधनिर्माणीमध्ये कामगार संपावर

खासगीकरणाविरोधात अंबाझरी आयुधनिर्माणीमध्ये कामगार संपावर

वाडी ( नागपूर) ः देशभरातील आयुधनिर्माणी कारखान्याचे खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याविरोधात आयुधनिर्माणी कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या संघटना एकवटल्या असून त्यांनी देशव्यापी संप पुकारला आहे. आज, मंगळवारपासून आंदोलनाला सुरवात झाली.
नागपूर नजीकच्या वाडी येथील अंबाझरी आयुध निर्माणी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर कर्मचारी एकवटले. केंद्र सरकारच्या विरोधात नारे निदर्शन करीत खासगीकरणाचा विरोध केला. या संपामध्ये ऑर्डनन्स फॅक्‍टरी एम्प्लॉईज युनियन (लाल झेंडा), इंटक, बीएमएस, लोकशाही कामगार युनियन याशिवाय कार्यालयीन कर्मचारी व अधिकाऱ्यांनी संपाला पाठिंबा दिला आहे.
नागपूर हे चार आयुध निर्माणी कारखाने यांचे केंद्र आहे. नागपूर नजीक चांदा (चंद्रपूर), जवाहर नगर (भंडारा), पुलगाव (वर्धा) व अंबाझरी या आयुध निर्माणी कारखान्यांचा समावेश आहे. देशभरातील 41 आयुध निर्माणी कारखान्यांचे सर्व कामगार 30 दिवसांपर्यंत संपावर जात असल्याने
सैनिकांना लागणारे शस्त्र उत्पादन, कपडा, वाहन, ट्रक, बंदुकीच्या गोळ्या याशिवाय इतर सैन्य आयुधे व तांत्रिक उपकरणे यांची निर्मिती बंद होणार आहेत. यामुळे त्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे. सरकारी आयुधनिर्माणी कारखान्यांचे खासगीकरण हा निर्णय राष्ट्रहिताचा नाही, असे मत कामगार संघटनेच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com