स्वमग्नतेत मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण जास्त

स्वमग्नतेत मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण जास्त

नागपूर - स्वमग्नता (ऑटिझम) मेंदूच्या वाढीतील विस्कळितपणा आहे. ही एक अवस्था असून ती आनुवंशिकही आहे. उशिरा विकास होतो. सरासरी दोनशे मुलांमध्ये एकाला हा विकार होण्याची शक्‍यता आहे. स्वमग्नता आढळून येणाऱ्या चिमुकल्यांमध्ये मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण चार पटींनी जास्त आढळून येते. विशेष असे, की प्रत्येकाच्या आयुष्यात मोबाईलचा अतिरेक वाढला. पाळण्यातील बाळाचे रडणे शांत करण्यासाठी आई-वडिलांनी मोबाईलला खेळणे बनवले. स्वतःचे काम शांतपणे व्हावे यासाठी खेळत्या मुलांच्या हाती ‘मोबाईल बॉम्ब’ देण्याचे काम पालकच करीत आहेत. कोवळ्या वयात मुलांच्या हातात मोबाईल आल्याने ऑटिझमचा (स्वमग्नता) धोका वाढला आहे. २०० बालकांमध्ये साधारण दोन मुलांना हा आजार दिसून येत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. 

दोन एप्रिल हा जागतिक ‘स्वमग्नता दिन’ (वर्ल्ड ऑटिझम डे) म्हणून पाळला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने १९८९ पासून हा दिवस जाहीर केला आहे. ऑटिझम किंवा स्वमग्नता म्हणजे स्वत:तच रमून राहण्याची तीव्र स्वाभाविक वृत्ती. स्वमग्न मुले इतर मुलांसारखं खेळतात, उड्या मारतात, किंबहुना इतर मुलांपेक्षा कधी कधी जास्त उंचावर चढतात, उड्या मारतात, ॲक्‍टिव्ह असतात. काही मुलं वेगळं वागत आहेत असं आपल्याला जाणवतं. हाक मारली तरी लक्ष न देणारे, बोटाने खाणाखुणा न करणारे, खूप प्रकाश पाहिल्यावर गोंधळणे, अशी मुले ‘स्वमग्न’ असतात. ही एक अवस्था आहे.

स्वमग्नता या विकाराविषयी समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे. वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्राच्या अभ्यासक्रमात अजूनही स्वमग्नता याबद्दल पुरेसा सखोल अभ्यास नाही. कुठलेही वैद्यकीय तत्काळ उपचार अस्तित्वात नाहीत. प्रशिक्षणातून आणि संस्कारातून विकास साधणे शक्‍य आहे. 
- डॉ. चंद्रशेखर मेश्राम,  अध्यक्ष, जागतिक ट्रॉपिकल न्यूरोलॉजी संघटना

स्वमग्नतेचा लक्षणे 
    दोन-तीन वर्षांनंतरच बोलण्यास सुरवात होते
    सामान्य मुलांमध्ये मिसळण्याचा कल दिसत नाही
    विचित्र खेळ खेळताना ते रमतात
    एका जागेवर न थांबण्याच्या सवयी 
    तीव्र प्रकाशाला घाबरणे

पालकांनी याकडे लक्ष द्यावे 
    लवकर निदान महत्त्वाचे ठरते 
    तज्ज्ञांची मदत घेऊन मुलांवर संस्कार करावेत 
    मुलांच्या विकासातील दोष पालकांनी मान्य करावा 
    संवेदना, भाषा या संदर्भात विशेष तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देणे 
    आवड असलेल्या क्षेत्रात अशा मुलांना घडवावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com