World Sleep Day : झोप कमी घ्याल तर लवकर म्हातारे व्हाल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

नागपूर-  दर दिवसाला डिजिटल माध्यमातून आपले मनोरंजन करण्यासाठी कंपनी कधी दीड तर कधी दोन जीबी डाटा देऊन आपल्याला झोपेपासून दूर नेतात. मात्र आपण जितके कमी झोपणार, तेवढेच आपण अस्वस्थ होणार. आपल्या झोपेचा सौदा होऊ देऊ नका, झोपेचा सौदा केला तर वेळेअभावीच तारुण्यापासून दूर जाल, झोप कमी घ्याल तर लवकर म्हातारे व्हाल, असे एका अभ्यासातून पुढे आले आहे. यामुळे झोपेला कोणाची नजर लागू देऊ नका. सुखाची झोप घ्या आणि तारुण्य अबाधित ठेवा, असे सर्वेक्षणातून मांडले आहे.

नागपूर-  दर दिवसाला डिजिटल माध्यमातून आपले मनोरंजन करण्यासाठी कंपनी कधी दीड तर कधी दोन जीबी डाटा देऊन आपल्याला झोपेपासून दूर नेतात. मात्र आपण जितके कमी झोपणार, तेवढेच आपण अस्वस्थ होणार. आपल्या झोपेचा सौदा होऊ देऊ नका, झोपेचा सौदा केला तर वेळेअभावीच तारुण्यापासून दूर जाल, झोप कमी घ्याल तर लवकर म्हातारे व्हाल, असे एका अभ्यासातून पुढे आले आहे. यामुळे झोपेला कोणाची नजर लागू देऊ नका. सुखाची झोप घ्या आणि तारुण्य अबाधित ठेवा, असे सर्वेक्षणातून मांडले आहे.

आधुनिक वैद्यक शास्त्राने केलेल्या झोपेच्या सखोल संशोधनानुसार हृदयासह मेंदूच्या आघातालाही निद्रा अर्थात अपुरी कारणीभूत असल्याचे आढळून आले आहे. झोप दुसऱ्या अवस्थेतून जात असताना खंडित झाली तर हृदयावर त्याचा आघात होतो. तिसऱ्या अवस्थेत असमतोल झाला तर मधुमेह होते. आणि ‘रेम’ ही अवस्था बिघडली तर नैराश्‍य आणि स्मरणशक्तीवर परिणाम होत असल्याची माहिती स्लिप मेडिसीन विषयात ‘जॉन्स हॉपकिन्स मेडिकल युनिव्हर्सिटी’तून पदवी पूर्ण करणारे डॉ. सुशांत मेश्राम यांनी आज येथे दिली. 

जगभर १५ मार्च हा दिवस ‘निद्रा दिन’ म्हणून पाळला जातो. यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे ‘हेल्दी स्लिप, हेल्दी एजिंग’ हे घोषवाक्‍य घोषित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. मेश्राम यांनी संवाद साधला. एका सर्वेक्षणासंदर्भात बोलताना ते म्हणाले, वटवाघुळाचे वजन अवघे ७ ते १० ग्रॅम असते. परंतु हा पक्षी ४० वर्षे जगतो. यावर संशोधन केले असता, वटवाघुळामधील ‘डीएनए’च्या दोन्ही बाजूला ‘टेलोमर’ हा घटक असतो. वाढत्या वयानुसार तो कमी होत नाही, उलट हा घटक कमी झाल्यास ‘रिजनरेट’ होण्यास मदत होते. यामुळे वटवाघूळ वजनाच्या तुलनेत अधिक जगतो. मानवाचे जगणे उलट आहे. वाढत्या वयामुळे ‘टेलोमर’ घटक कमी होतो; परंतु अपुरी झोप होत असेल तर घटक कमी होण्याची गती वाढते. यामुळे चांगली झोप घ्या, असे डॉ. मेश्राम म्हणाले.

झोपेचे गणित चुकले तर वंध्यत्व...  
झोप न येणे, झोपेत श्‍वास थांबणे, खाटेवर पडल्यानंतर तत्काळ झोप येणे, झोपेत फिट येणे, झोपेत घोरणे, दैनंदिन लयीचे आजार, गाढ झोपेत असताना मेंदू जागा होणे, अचानक काही काळासाठी स्मृतिभ्रंश होणे, विसरभोळेपणा, दिवसा थकल्यासारखे वाटणे, झोपेतून उठताना थकवा जाणवणे, कधी एकदम आनंद तर कधी एकमद दुःख, मुलांमध्ये अतिक्रियाशीलता, झोपेत लघवी करणे, अभ्यासात मन न लागणे, झोपेतून उठताना पुन्हा झोपेची इच्छा मनात असणे, नैराश्‍यापासून तर हृदय, मेंदूरोग आणि कॅन्सर आणि वंध्यत्व अशा प्रकारचे ८८ आजार होतात, असे डॉ. सुशांत मेश्राम म्हणाले. 

-एकूण लोकसंख्येपैकी ४५ टक्के व्यक्तींना निद्रानाशाचा त्रास आहे. 
-कमी झोपेचे (इन्झोमनिया) २५ टक्के रुग्ण आहेत. 
-झोपेत घोरणाऱ्यांची संख्या २० टक्के आहे. 
-रेस्ट लेस लेग सिंड्रोम असणारे १० टक्के व्यक्ती आहेत. 
-सरासरी लोकसंख्येच्या ३० टक्के शिफ्ट वर्क डिसॉर्डरमध्ये मोडतात. 
-मानवाला जडणाऱ्या ९० टक्के आजारांची मुळे निद्रानाशात दडलेली आहेत. 
-मधुमेहाच्या विळख्यात अडकलेल्या ४२ व्यक्‍तींना गंभीर स्लीप ॲप्निया सिंड्रोम असतो. 
-निद्रानाश झालेले ८६ टक्के रुग्ण मानसिक आजाराच्या उंबरठ्यावर आहेत. 
-उच्च रक्तदाब असलेल्या ८४ टक्के नागरिकांना स्लीप ॲप्निया आढळतो.

झोपेच्या ४ अवस्था आहेत. रेम ही अवस्था सर्वांत महत्त्वाची आहे. यातील तीन अवस्था आणि रेम अशा चार अवस्थांचे झोपेचे घड्याळ आहे. या झोपेच्या घड्याळाची सायकल ९० मिनिटांची असते. पहिल्या तीन अवस्था ७० मिनिटांच्या आणि रेमची अवस्था २० मिनिटांची असते. एका व्यक्तीला सरासरी ८ तास झोप आवश्‍यक आहे. 
-डॉ. सुशांत मेश्राम, विभागप्रमुख,  सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर

वयोमानानुसार "स्टॅन्डर्ड' झोप 
-0 ते 1 वर्षे - 20 ते 22 तास 
-1 ते 5 वर्षे - 12 ते 15 तास 
-5 ते 12 वर्षे - 10 तास 
-12 ते 18 वर्षे - 09 तास 
-18 ते 45 वर्षे - 08 तास 
-45 ते पुढे - 06 तास 

Web Title: World Sleep Day special story