१०० व्यक्तींच्या डोळ्यात पेरला उजेड

केवल जीवनतारे
रविवार, 10 जून 2018

नागपूर - जगातील प्रत्येक पाच अंधांपैकी एक अंध भारतात आहे. वर्षाकाठी ३५ हजार नेत्ररोपणांची गरज असताना, नेत्रदानाच्या अल्प प्रमाणामुळे अवघ्या ४ हजार शस्त्रक्रिया होतात. २५ लाख लोकसंख्येच्या उपराजधानीत मेडिकल, मेयोसह खासगी नेत्रपेढ्यांमार्फत अवघ्या १०० व्यक्तींच्या डोळ्यात उजेड पेरण्यात आला. या अल्पदानामुळेच नेत्रदानाविषयी समाजाचे डोळे अद्यापही मिटलेलेच आहेत. 

दहा जून.. जागतिक दृष्टिदान दिन. या दिवशी अंधांच्या समस्येवर नेत्रदानाचा संकल्प करण्याची गरज आहे. जगात दहा कोटी अंध व्यक्तींपैकी भारतात सुमारे अडीच कोटी अंध आहेत. त्यापैकी ७० टक्के रुग्णांना नेत्ररोपण शस्त्रक्रियेद्वारे पुन्हा दृष्टी प्राप्त होऊ शकते. कुपोषण, ‘अ’ जीवनसत्त्वाचा अभाव. डोळ्यांत कचरा, फटाक्‍याचा स्फोट अथवा रसायन गेल्याने, गोवर, कांजिण्या किंवा अन्य कारणांनी लहान वयात अथवा तारुण्यात दृष्टी गमावलेल्यांची संख्या २५ लाखांपर्यंत आहे. 

राज्यात ११ कोटींपैकी अंध व्यक्ती - १० लाख ५० हजार
अंधत्व आलेल्यांची संख्या - ५ लाख ५० हजार
बुबुळाच्या आजाराने अंध झालेल्यांची संख्या - १० हजार
दृष्टिदोष किंवा इतर आजारांमुळे - २ लाख ९२ हजार
राज्यात दरवर्षी नेत्रदानातून मिळणारे डोळे - ५ हजार
राज्यात डोळ्यांची गरज - ३५ हजार 

उपराजधानीत दरवर्षी सहा हजार व्यक्तींचे मृत्यूनंतर शवविच्छेदन होते. शवविच्छेदन होत असललेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी सक्तीचे नेत्रदान केल्यास दरवर्षी शेकडो हजारांवर अंधाच्या डोळ्यात प्रकाश पेरला जाईल. परंतु यातील ५ टक्केही मृतकांचे नेत्रदान होत नाही.
- डॉ. अशोक मदान, नेत्ररोग विभागप्रमुख, मेडिकल.

Web Title: World vision day nagpur news